बिल काढण्यासाठी मागितलेली टक्केवारी आली अंगलट, ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी सापडला जाळ्यात,जिल्ह्यात खळबळ

सोलापूर जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून लाच मागण्याच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, कारण लाच स्वीकारण्याचे अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत परंतु तरीही शासकीय कार्यालयांमधील मधील भ्रष्टाचार काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे .

बिल काढण्यासाठी मागितलेली टक्केवारी आली अंगलट, ग्रामसेवकासह विस्तार अधिकारी सापडला जाळ्यात,जिल्ह्यात खळबळ

सोलापूर जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून लाच मागण्याच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, कारण लाच स्वीकारण्याचे  अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत परंतु तरीही शासकीय कार्यालयांमधील मधील भ्रष्टाचार काही केल्या थांबत नसल्याचे दिसत   आहे .
ग्राम पंचायतीने  ग्रामपंचायत सदस्यमार्फत केलेल्या कामाचे  बिल मंजूर होऊन मिळनेकरिता स्वतःला 1 टक्का  तर विस्तार अधिकाऱ्याला 1 टक्का  अशी 2 टक्के लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला   रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून  विस्तार अधिकाऱ्याला पंचायत कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे यामुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पारे ता.सांगोला गावातील गोरडवस्ती येथे  15 वित्त आयोगातून पाईप लाईन चे काम मंजूर  झाले असून सदरचे काम हे ग्रामपंचायतला मिळाले होते त्यामुळे सदर कामाची सर्व जबाबदारी पार पडण्यासाठी येथील सरपंचांनी याबाबत लेखी आदेश देऊन एका  ग्रामपंचायत सदस्यांची नियुक्ती केली होती, त्यानुसार काम पूर्ण झाल्यानंतर सदर कामाचे बिल मंजूर होऊन मिळणे करता संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा केला असता ग्रामसेवक सुरेश मधुकर  फासे यांनी सदर बिलावर सही करून पंचायत समिती सांगोला येथील विस्तार अधिकारी श्रावण बाजीराव घाडगे यांच्याकडे बिल सादर करण्याकरता स्वतःसाठी 1 टक्का प्रमाणे पंधराशे तर पंचायत समितीतून बिल मंजूर होण्याकरता अधिकारी घाडगे यांच्या करता 1 टक्का प्रमाणे 1500 असे एकूण 3 हजार रुपये ची मागणी केली ,
सदर मागणीस विस्तार अधिकारी घाडगे यांनी संमती देऊन तडजोडी अंती 500 रुपये देण्यास सांगून वरील रक्कम ग्रामसेवक फासे यांच्याकडे देण्यात सांगितले त्यानुसार ग्रामसेवक फासे यांनी तक्रारदार यांच्याकडून 2500 रुपये लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे तर आरोपी क्रमांक 2 घाडगे विस्तार अधिकारी यांना पंचायत समिती कार्यालयात ताब्यात घेण्यात आले.

  सदरची कामगिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस उप अधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक,पोलीस अंमलदार स्वामी, पोना घाडगे,पोशी स न्नके, चापोना उडानशिव यांच्या पथकाने केली आहे.
 या कारवाईमुळे सांगोल तालुक्यात मोठी खळबळ उडाली  शासकीय कार्यालयांमध्ये  टक्केवारीचा गोरख धंदा किती भयानक असतो हे या प्रकरणामुळे उघडकीस आले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ चे कलम ७ प्रमाणे १) सुरेश सुधाकर फासे, वय ४५ वर्षे व्यवसाय नोकरी पद ग्रामसेवक, पारे ग्रामपंचायत 
२) श्रावण बाजीराव घाडगे, वय ५६ वर्षे व्यवसाय नोकरी पद विस्तार अधिकारी, पंचायत समिती यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.