शिवरत्न ने पटकावला जिल्ह्यात मोठा बहुमान

शिवरत्न ने पटकावला जिल्ह्यात मोठा बहुमान

 *शिवरत्न कॉलेज च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पंढरपूर-- गादेगाव ता. पंढरपूर येथील शिवरत्न जुनिअर कॉलेज  मधील इयत्ता बारावी सायन्स वर्गात शिकणारा विद्यार्थी प्रथमेश बाळासाहेब भोसले जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे शिवरत्न कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून प्रथमेश भोसले यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

ग्रामीण भागांमध्ये महाविद्यालय चालवणे मोठी तारेवरची कसरत असते यासाठी अनेक आर्थिक गणिते जुळवावी लागतात.परंतु गेल्या अनेक वर्षांपासून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यात नावलौकिक मिळवणार्‍या शिवरत्न कॉलेज ने अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले असून गुणांच्या यादीत नाव झळकवणारे हे  कॉलेजचे  वकृत्व स्पर्धा  व खेळामध्ये ही उत्तम मैदान गाजवत असल्याचे पहावयास मिळत आहे.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेली शिवरत्न शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
 या अगोदर राज्यस्तरीय युवा छात्र संसद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य मध्ये शिवरत्न चा विद्यार्थी  रहीम शेख रा. पळशी ता. पंढरपूर याने राज्यसरीय पुरस्कार पटकावला आहे.

शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, क्रीडा स्पर्धा इत्यादीमध्ये शिवरत्न ची उत्तुंग भरारी दिसून येत आहे.
 प्रथमेश भोसले याच्या यशात शिवरत्न जुनियर कॉलेज चे  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान आहे.
त्याच्या या यशाबद्दल शिवरत्न चे संस्थापक गणपत मोरे सर,राजेंद्र भोसले सर,पवार सर, देशमुख सर,कांबळे सर,मुलाणी सर,संदीप  बागल यांच्यासह गादेगाव ग्रामस्थ व पंढरपूर तालुक्यांमध्ये  त्याचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.