पंढरीत भरणार अक्षरांचा मेळावा, दि. 28 व 29 मे ला स्वेरी येथे होणार राज्यस्तरीय अक्षरसंमेलन

पंढरीत भरणार अक्षरांचा मेळावा, दि. 28 व 29 मे ला स्वेरी येथे होणार राज्यस्तरीय अक्षरसंमेलन

पंढरपूर,टीम ------

 महाराष्ट्रातील सर्व अक्षरप्रेमी,रांगोळीकारचित्रकार पंढरपूर मध्ये एकत्र येणार असून 2829 मे रोजी राज्यस्तरीय अक्षरसंमेलन स्वेरी काॕलेज येथे संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक प्राचार्य डाॕ.बी.पी.रोंगे,अक्षरमित्र अमीत बोरकडे व स्वागताध्यक्ष प्रशांत वाघमारे यांनी दिली.

     माझी शाळा माझा फळा समुह व स्वेरी काॕलेज आॕफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या संमेलनाचे अध्यक्षपद राज्याच्या महसुल व वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे भुषविणार आहेत.यावेळी अक्षर सन्मान पुरस्कार देवून महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या कलाकारांचा सन्मान मा.आ.प्रशांत परिचारक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दिलीप स्वामी,शिक्षणाधिकारी डाॕ.मा.किरण लोहार,स्वेरी काॕलेजचे प्राचार्य डाॕ.बी.पी.रोंगेसर,मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे,भारत माळी व मान्यवरांचे उपस्थितीत केला जाणार आहे. 

     28 मे रोजी राज्यातील ज्येष्ठ सुलेखनकारांची सुलेखनावर मुक्तचर्चा होणार आहे.व्यक्तीचित्र रेखाटन प्रात्यक्षिक देव हिरे,दिगंबर अहिरे(नाशिक) व अजय जिरापूरे(अमरावती) हे सादर करणार आहेत. यानंतर सामुहिक सुलेखन होणार आहे.

     अक्षरगणेशा प्रात्यक्षिक ज्ञानेश्वर कवडे(नगर ) व आशिष तांबे(मुंबई )सादर करणार आहेत.जगप्रसिद्ध स्वाक्षरीकार गोपाळ वाकोडे(बुलढाणा) हे मी मराठी ,माझी स्वाक्षरी मराठी याद्वारे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.रात्री संगीत मैफिल सादर होणार आहे.

     29 मे रोजी सकाळी सुलेखन प्रात्यक्षिक अनिल गोळवलकर(मुंबई ) सादर करणार आहेत. सर्वांना उत्सुकता असणार्या अक्षर रांगोळी प्रात्यक्षिक सादर होणार आहे.यामध्ये गणेश माने(पुणे),दिपक दिक्षीत(जालना),योगेश उमवणे,वैशाली पवार(मुंबई ),मल्लीनाथ जमखंडी(सोलापूर ) व मोहित पोवार(पुणे) हे सदर करणार आहेत.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वेरी काॕलेज आॕफ इंजिनिअरिंग,माझीशाळा माझा फळा,आचार्य प्रतिष्ठान,शशिकला फाऊंडेशन ,स्वच्छंद ग्रुप,येअरमेल पेन,ई स्मार्ट गुरुजी प्रयत्न करीत आहेत.

      या संमेलनासाठी महाराष्ट्रातील सर्व कलाकार शिक्षकांनी आॕनलाईन नोंदणी केलेली आहे. रविवारी 29 मे 2022 ला दुपारी 1 नंतर या राज्यस्तरीय अक्षरसंमेलनातील कलाकृती नागरीकांना पाहण्यास खुल्या केल्या जाणार असल्याने सर्व कलाप्रेमींनी याचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी साधावी असे अवाहन स्वागताध्यक्ष प्रशांत वाघमारे यांनी केले आहे.