आ. यशवंत माने यांनी जपली सामाजिक बांधिलकी,८०वर्षे वयाच्या आजोबा सोबत घेतला फोटो

आ. यशवंत माने यांनी जपली सामाजिक बांधिलकी,८०वर्षे वयाच्या आजोबा सोबत घेतला फोटो
पंढरपूर- विवाह सोहळा असो या अन्य कार्यक्रम स्थळी आमदार, मंत्री, खासदार यांच्यासह सेलिब्रेटी यांची उपस्थित लाभल्यास सेल्फी व फोटो काढण्यासाठी युवकाची झुंबड उडालेली पाहावयास मिळत आहे. मात्र मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे मात्र एक आगळेवेगळे दृश्य पाहावयास मिळाले. रविवार दि १० जानेवारी रोजी मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे पोटरे बाप्पा यांच्या कडील विवाहास आ. यशवंत  माने व पंचायत समिती सदस्य  अजिंक्यराणा पाटील यांनी हजेरी लावली.             
        यावेळी आ. माने व अजिंक्यराणा पाटील यांच्या समवेत फोटो काढण्यासाठी नेहमी प्रमाणे युवकांची मोठी झुंबड उडाली होती. मात्र या युवकांचा मोह पाहून ८० वर्षातील वयोवृध्दाना सुद्धा आ. यशवंत (तात्या) माने यांच्या समवेत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. परंतु गाडी जवळ येइपर्यंत पुढील कार्यक्रमासाठी आमदार  महोदय गाडीत बसले आणि गाडी सुरू होताच ८० वर्षाचे वयोवृद्ध गाडी जवळ येताच कार्यकर्त्यांनी आमदार महोदयांना गाडी थांबवून आजोबांना तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे असे सांगताच क्षणाचा ही विलंब न करता गाडी थांबवून खाली उतरून त्या ८० वर्षाच्या वयोवृध्दाबरोबर फोटो काढले व त्यांचे आमदार माने यांनी  आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्या ८० वर्षाच्या वयोवृध्दाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा सर्वात मोठा आनंद दिसून आला.