सोलापूर जिल्ह्यातील सहकारात पवार फॅमिली ची दमदार एन्ट्री

सोलापूर जिल्ह्यातील सहकारात पवार फॅमिली ची दमदार एन्ट्री

सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पवारांची एन्ट्री, आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो च्या ताब्यात


 पंढरपूर---सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत. मात्र गेल्या काही वर्षांसापासुन काही कारखान्यांना अंतर्गत मतभेद व  राजकारणामुळे चांगलीच घरघर लागली आहे .त्यामुळे ऊस उत्पादक सभासद परेशान झाला आहे .कारण हक्काचे कारखाने बंद पडू लागल्यामुळे दुसऱ्या कारखान्याकडे हाजी हाजी व सर्वांची च मनधरणी करून जीवापाड जपलेला ऊस तोडणीसाठी घालावा लागत आहे. त्यामुळे ऊस लागवड क्षेत्रही कमी झाले आहे.

आता सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आता पवार फॅमिलीने एन्ट्री केली आहे .कारण करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो च्या ताब्यात 25 वर्षासाठी भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय झाला आहे.

आदिनाथ साखर कारखान्यावर राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज असल्याने या बँकेने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. गेल्या १५ वर्षांपासून आदिनाथ कारखान्यावर रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील बागल गटाची एकहाती सत्ता होती .मात्र संचालक मंडळा मधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकांचे अंतर्गत एकमेकांवर होणारेआरोप-प्रत्यारोप या विविध कारणांमुळे कारखाना अडचणीत आला.मंगळवारी १२ जानेवारी रोजी मुंबई येथे राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो ला देण्यात आला आहे .

 आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा  मागील दहा वर्षापासून रखडत रखडत चालत असल्यामुळे कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखाना जवळ असूनही बाहेरील कारखान्यास ऊस द्यावा लागत होता. कारखाना  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या फॅमिली मध्ये कोणतरी चालवण्यासाठी घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. कारखान्यातील कामगारांच्या पगाराचा प्रश्नही महाराष्ट्रमध्ये चांगलच गाजला होता. अश्यातच कारखान्यावरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना कारखाना वारंवार बंद अवस्थेत राहत होता. त्यामुळे कारखाना विकला जाणारा की ? भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला जाणार याबाबत उलटसुलट चर्चा होती.आता मात्र या चर्चेवर कायमचा शिक्कामोर्तब झाला आहे.आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी आमदार रोहित पवार उत्सुक असल्याचे वारंवार राजकीय जाणकार मंडळी मधून बोलले जात होते. या  शर्यतीत करमाळ्याचे आ.संजय शिंदे हे देखील होते. परंतु यामध्ये आता  बारामतीच्या च पवारांनी बाजी मारली आहे. आदिनाथ साखर कारखाना बारामती ॲग्रो ने भाडे तत्त्वावर २५ वर्षासाठी चालविण्यासाठी घेतला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या मधून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. या  कारखान्यानंतर आता जिल्ह्यातील कोणता कारखाना पवार चालवण्यासाठी ताब्यात  घेतात याबाबत मात्र मोठी  उत्सुकता लागली आहे .कारण इतरही काही कारखान्यांना अंतर्गत राजकारणामुळे घरघर लागली असून या कारखान्यांवर ही कोट्यवधींचे कर्ज झाले आहे.  उशिरा का होईना सहकार क्षेत्रात किंगमेकार मानल्या जाणाऱ्या बारामतीच्या पवार फॅमिलीने सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आदिनाथ च्या रुपाने एन्ट्री केल्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच सुखावला असल्याचेही पहावयास मिळत असून बारामतीच्या पवार परिवाराचे जोरदार स्वागत केले जात  आहे.