कोरोना काळात तहसील कार्यालय होते बंद,साहेबांनी नागरिकांनी केलेल्या अर्जाला दाखवली केराची टोपली,चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच दिला खो,

कोरोना काळात तहसील कार्यालय होते बंद,साहेबांनी नागरिकांनी केलेल्या अर्जाला दाखवली केराची टोपली,चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच दिला खो,

नातेपुते,टीम-------

                        माळशिरस तहसील कार्यालयाकडून कोरोनाविषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या निमित्ताने तहसीलदार कार्यालय बंद करण्यात आले होते.या कालावधीदरम्यान नागरीकांना देण्यात आलेल्या ईमेल वरती अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.परंतु नागरीकाना याचा कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.त्यामुळे सरकारी काम व सहा महिने नव्हे तर कायमचे थांब हा प्रकार येथे सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.


                      जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या २०२१/डिसीबी/०२/आर आर/१७२१ दि. ५ एप्रिल २०२१ या आदेशान्वये तहसील कार्यालयात दि.३० एप्रिल २०२१ पर्यंत अभ्यागतांना येण्यास परवानगी नाही.तरी अभ्यागतांना तहसील कार्यालय माळशिरस येथे प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.नागरिकांनी आपले अर्ज कार्यालयाच्या" tahmalshiras@gmail.com "या ईमेल वर पाठविण्याचा फलक तहसील कार्यालय माळशिरसच्या बाहेर लावण्यात आला होता.     
               या आदेशाच्या दिनांकापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या निमित्ताने राज्य शासनाच्या निर्बंधाच्या आदेशाने त्याच बरोबर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने नागरिकांसाठी सदरील कार्यालय माहे जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद होते.ते माहे जून २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले आहे.या कालावधी दरम्यान तहसील कार्यालयाकडून दिलेल्या ईमेल वरती नागरिकानी केलेल्या अर्जाना आजपर्यंत कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे डिजिटल युगात नागरिकांचा मोठा भ्रमनिरास झाला असून ज्यांनी नागरिकांच्या अर्जाला केराची टोपली दाखवून चक्क जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या आदेशालाच खो दिला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी व अर्ज केलेल्या  नागरिकांना न्याय मिळवून दयावा अशी मागणी होत आहे.