मंगळवेढ्यात लांडग्याचा धुमाकूळ,ग्रामस्थांसह मुक्या प्राण्यांवर हल्ला,ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

मंगळवेढ्यात लांडग्याचा धुमाकूळ,ग्रामस्थांसह मुक्या प्राण्यांवर हल्ला,ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
मंगळवेढा,टीम------
मंगळवेढा तालुक्यातील 3 गावांत लांडग्याने धुमाकूळ घातला असून दि. १२ जून रोजी बावची येथे पिसाळलेल्या लांडग्याने अनेक जणांचा चावा घेवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 या लांडग्याच्या हल्ल्यात सलगर खुर्द मधील तुकाराम खडतरे(वय60), जयहिंद तुकाराम खडतरे (वय40),अक्षय जयहिंद खडतरे (वय32),यांच्या वर लांडग्याने  रात्री अचानक हल्ला केला.   हे कुटुंब घराबाहेर झोपलेले असतांना या चौघांवर लांडग्याने हल्ला केला.या सर्वांनी जोराने आरोळ्या मारल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले.
बावची येथील यशराज राजू फोंडे (वय १2) , सुकदेव सिदू जाधव (वय ६०), तानाजी श्रीरंग चव्हाण (वय ३२) यांना तातडीने सोलापूर येथे सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी महेश खांडेकर यांनी स्वतःच्या गाडीतून नेले.याशिवाय अनुसया बसवराज माळी (वय ३५), पार्वती इराप्पा माळी (वय ३२), भारत विठोबा म्हमाणे यांनाही लांडग्याने जखमी केलेले आहे. 

तसेच या हल्ल्यात दोन कुत्रे, एक गाय व म्हैस यांनाही चावले आहे.सदर लांडगा पिसाळलेला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सायं ४ ते रात्री १ वाजेपर्यंत हा थरार चालू होता, त्यामुळे बावची परिसरातील सर्व नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. या परिसरात वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
बावची येथील वनक्षेत्रात अनेक वन्यजीव वास करतात परंतु कोणतेही कुंपण नसल्याने ते थेट नवी
मानवी वस्त्यांवर हल्ले करीत असतात. त्यामुळे  याबाबत सर्व नागरिकांत नाराजी आहे . जखमी झालेल्यांना त्वरीत भरपाई मिळावी म्हणून नातेवाईकांची मागणी आहे . हुलजंती बीटचे हवालदार  सलगर यांनी लगेच बावची येथे घटनास्थळी भेट दिली असून ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन पोलीस व वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.