जोरात वीज कडाडली,घाबरून एका 6 वर्षाच्या चिमुकलीचा गेला जीव.......पालकांनो पावसाळ्यात घ्या मुलांची काळजी

जोरात वीज कडाडली,घाबरून एका 6 वर्षाच्या चिमुकलीचा गेला जीव.......पालकांनो पावसाळ्यात घ्या मुलांची काळजी

औरंगाबाद,टीम-------

(दि.८जून२०२१)

सध्या राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.हा पाऊस बहुतांश ठिकाणी नुकसानकारक ठरत असून वीज पडून अनेक ठिकाणी जीवितहानी व जनावरांचा मृत्यू झाला आहे.परंतु मुसळधार पाऊस पडत असताना वीज कडाडन्याचा आवाजमुळे एक 6 वर्षाची चिमुकली घाबरून बेशुद्ध पडुन मृत्यू झाली आहे. ही दुर्दैवी घटना 6 जून रोजी रात्री 7.30 वाजता जिंसे भागातील तक्षशिला नगरात घडली आहे.

या भागात रविवारी मुसळधार पाऊस सुरू होता,त्यामुळे सर्वजण घरीच होते.रात्री पाऊस सुरू असताना चिमिकली अक्सा पावसाची गंमत पाहण्यासाठी दारात उभी होती  तेथूनच ती घरातील नातेवाईकांशी बोलत होती,परंतु या वेळी  अचानक वीज कडाडली, मोठा आवाज झाला त्यामुळे घाबरून  अक्सा बेशुद्ध पडली तेव्हा घरच्यांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू असताना रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.


या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस सुरू असतांना लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका ,त्यांच्या वर लक्ष ठेवा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

अक्सा इस्माईल शेख असे त्या बालिकेचे नाव असून त्या बालिकेचे वडील हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत