सेल्फी काढण्याचा मोह नडला,उजनीच्या पाण्यात बुडून अकलूजच्या बापलेकाच्या मृत्यू, ४ जणांना वाचवण्यात यश

सेल्फी काढण्याचा मोह नडला,उजनीच्या  पाण्यात बुडून अकलूजच्या  बापलेकाच्या मृत्यू, ४ जणांना वाचवण्यात यश


 वांगी- 3, करमाळा उजनीच्या बॅक वॉटर मधील घटना

 करमाळा,टीम---

बदलत्या आधुनिक जगा सोबत आता माणसेही बदलत जात आहेत.आधुनिक जीवन शैली जगण्यासाठी जो तो धडपड करत आहे. पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट असणाऱ्या कॅमेराची  जागा हा आता हाय- फाय मोबाईल ने घेतली आहे .त्यामुळे जीवनाची विविध व आनंदाचे क्षण  आपल्या  मोबाइलमध्ये टिपण्यासाठी अनेकांची धडपड असते. यामध्ये सध्या सेल्फी घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु हाच सेल्फी अनेकांच्या जिवाचा खेळ बनत असल्याचे प्रकार पहावयास मिळत आहे. असाच एक सेल्फी घेण्याच्या नादात वांगी-3 भागातील उजनी जलाशयात बोट  उलटल्याने अकलूज येथील बाप लेकाचा बुडून मृत्यू झाला आहे. परंतु सुदैवाने मयत व्यक्तीची पत्नी आणि  मुलीसह अन्य दोघांना वाचवण्यात मात्र यश आले आहे.
 रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी अकलूज रा. गुरूनगर येथील विकास गोपाळ शेंडगे (वय 39) स्वाती विकास शेंडगे (वय 30) अजिंक्य  विकास शेंडगे (वय 13) अंजली विकास शेंडगे हे सर्वजण करमाळा तालुक्यातील केम येथे नातेवाईकाकडे लग्नकार्यासाठी गेले होते. त्यानंतर रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे वांगी नंबर 3 ते मित्र जयवंत सातव यांच्याकडे गेले.  शेंडे कुटुंबियांना बोटीतून फिरण्याची इच्छा झाल्याने उजनी धरणात मासेमारीसाठी असलेल्या बोटीतून दुपारी तीन वाजेच्या सुमारास  सातव यांच्या सोबत फिरण्यासाठी गेले.बोट खोल पाण्यात गेल्यावर अचानक त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला.मात्र सेल्फी काढत असताना बोट पलटल्याने सर्वजण पाण्यात बुडाले तेव्हा विकास शेंडगे आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा बुडून मृत्यू झाला तर स्वाती शेंडगे, मुलगी अंजली शेंडगे, जयवंत सातव व त्यांचा मुलगा यांना वाचवण्यात  ग्रामस्थांसह मच्छीमारांना यश आले. आहे स्वाती शेंडगे व अंजली शेंडगे यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.

उजनी धरणातील पाण्यात  सेल्फी काढत असताना यापूर्वीही असे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.मागील काही वर्षांपूर्वी अकलूज येथीलच काही डॉक्टर मंडळी पाण्यात बुडवून मृत्य झाला होता.त्यामुळे  सेल्फी अनेकांच्या जीवाशी येत  आहे परंतु तरीही नागरिकांना मात्र सेल्फी करण्याचा मोह काही सुटेनासा  दिसत नाही त्यामुळेच  हा सेल्फी अनेकांच्या जीवावर उठला असून तो अनेकांचा जीव ही घेत आहे या सेल्फीने अकलूज येथील बाप लेकाचा बळी घेतला असल्या मुळे संपूर्ण अकलूज परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शक्य असेल तर नक्कीच सेल्फी वर बंदी आणता आली तर  मोबाईल कंपन्यांनी विचार करावा  अन्यथा नागरिकांनी सावधानता बाळगणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले जात आहे.व उजनी जलाशयात नेहमीच पर्यटनासाठी नागरिक येतात त्यांच्या पर्यटनासाठी योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.