आता .....जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांची झोप उडणार,काम न झाल्यास ठेवणार डांबून? जनशक्ती झाली आक्रमक

आता .....जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांची झोप उडणार,काम न झाल्यास ठेवणार डांबून? जनशक्ती झाली आक्रमक

करमाळा,टीम-----

शेलगाव ते वांगी - ०२ या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वांगी - ०२ जवळील अनेक गावांच्या समोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी तसेच लघु उद्योजकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. आणि यामुळे अनेकांना अर्धांग गमवावे लागले आहे. तर काहींचा या रस्त्यावर अपघात झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले. रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाही. 

सदरचा रस्ता हा जिल्हा परिषदेकडे येत असून जि. प.अध्यक्ष हे स्वतः करमाळा तालुक्यातील आहेत,मात्र तरीही रस्त्याची ही अवस्था झाली आहे.येथील जि.प सदस्य व  अधिकारी झोपा काढत आहेत काय ? मात्र आता त्यांची  झोप आता जनशक्ती संघटना उडविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अतुल खुपसे- पाटिल यांनी दिला आहे.


या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन जागे होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटिल यांच्याकडे फोन करून तक्रार दिली.त्यामुळे खूपसे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जर प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी  लावला नाही तर संबंधित अधिकऱ्यांना कोंडून ठेऊ असा इशारा खूपसे पाटिल यांनी दिला आहे. 


संबंधित रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी  लागला नाही तर, संबंधित अधिकाऱ्यांना डांबून ठेवेले जाईल व जोपर्यंत हा रस्ता होऊन ग्रामस्थांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत पाठपुरावा  करत राहील. अधिकाऱ्यांनी जर पुढील दोन दिवसात कारवाईला सुरुवात नाही केली तर आम्ही शेतकरी, ग्रामस्थ आणि जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करणार आहोत.
      - अतुल खूपसे पाटिल,अध्यक्ष जनशक्ती संघटना