चक्क देवभूमी पंढरीत गायब  झाला रस्ता, सक्षम नगरपालिकेच्या कारभाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष

चक्क देवभूमी पंढरीत गायब  झाला रस्ता, सक्षम नगरपालिकेच्या कारभाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष

रस्ता वाहतूक कोंडीला ठरू शकतो पर्याय

। पंढरपूर,टीम------

देवभूमी पंढरीनगरीमध्ये सतत मोठी रहदारी असते. त्यामुळे सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांची मोठी गर्दी असते. यामध्ये दुचाकींचा मोठा समावेश असतो. दुचाकी बिनधास्तपणे रस्त्यावर लावल्या गेल्यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. परंतू सदर रस्ता हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून चक्क गायब झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे सक्षम असणारी नगरपालिका सदर रस्ता खुला करण्याचे धाडस करणार का? हे पाहणे आता गरजेचे आहे.

नगरपरिषदेच्या वतीने शहरामध्ये काही लहान मोठे रस्ते तयार केले आहेत. परंतू यातील महत्वाचे रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून गायब झाल्याचे पहावयास मिळत आहे. येथील अमर हॉटेल शेजारून वरच्या भागात प्राथमिक शिक्षक सोसायटीकडे जाणारा एक लहान बोळातील रस्ता आहे. परंतू हा रस्ता चक्क गायबच झाला आहे.
मध्यंतरी सदर रस्ता दुरूस्त झाला. काही प्रमाणात दुचाकी वाहतूक या रस्त्यावरून सुरू झाली. परंतू हा रस्ता आता काहीजणांनी आपलसा करत त्यावर मालकी हक्क निर्माण केला आहे. एका  व्यवसायिकाने दुकानाच्या मॉलचे काम करताना रस्त्याची पुर्णपणे विल्हेवाट लावली. त्यानंतर रस्ता दुरूस्त होईल अशी अपेक्षा होती. त्याबाबत न.पा.च्या अधिकार्‍यांनी संबंधिताला सूचनाही दिल्या होत्या.परंतू रस्ता आजही मोडक्या तोडक्या अवस्थेत आहे.
       (ही जाहिरात पहा व मोठा लाभ मिळावा...)
याच रस्त्यावर खुलेआमपणे मटक्यासाठी दिवसभर रिक्षा लावून मटका घेण्याचे काम होत असते. वास्तविक पाहता हा रस्ता खुला झाला तर नवीन बसस्थानक परिसराकडे व तेथून स्टेशन रोडकडे येण्यासाठी हा रस्ता दुचाकी वाहनधारकांना सोयीचा होऊ शकतो. यामुळे स्टेशनरोडवरील वाहनांची गर्दीही कमी करता येऊ शकते. परंतू रस्त्यावरील अतिक्रमणाकडे व रस्ता खुला करण्याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्यचा धक्कादायक प्रकार पहावयास मिळत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता गायब झाला आहे.त्यामुळे केवळ ठेकेदार जगविण्याचे काम शहरात सुरू आहे का?हा सवाल उपस्थित होत असून आता यात  लोकप्रतिनिधींनीच लक्ष घातले तर हा रस्ता खुला होईल व वाहनधारकही सुखावतील अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.