त्या 12 सदस्यांच्या नियुक्तीबाबत सरकार आग्रह धरत नाही,मग तुम्हालाच का ? पडली घाई, राज्यपालांनी सुनावले एका काँग्रेस नेत्याला खडेबोल

त्या 12 सदस्यांच्या नियुक्तीबाबत सरकार आग्रह धरत नाही,मग तुम्हालाच का ? पडली घाई, राज्यपालांनी सुनावले एका काँग्रेस नेत्याला खडेबोल

पुणे,टीम-----

त्या  12 सदस्यांच्या नियुक्ती बाबत सरकार आग्रह धरत नाही, मग तुम्हालाच का? घाई पडली आहे.या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका काँग्रेस नेत्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  हे स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पुणे येथे आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,भाजपचे खा.गिरीश बापट,काँग्रेसचे नेते शरद रणपिसे आदी उपस्थित होते.

ध्वजारोहण समारंभ झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व अजितदादा पवार यांनी मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या.तेव्हा राज्यपाल कोश्यारी यांना अचानक काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी त्या 12 सदस्यांच्या नियुक्ती बाबत विचारणा केली. तेव्हा तात्काळ उत्तर देत राज्यपालांनी मागे उभ्या असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बोट दाखवत, हे माझे मित्र आहेत, सरकार आग्रह धरत नाही,मग तुम्ही का आग्रह धरता?असा सवाल केला. तेव्हा मात्र अजितदादांनी स्मितहास्य केले. राज्यपालांनी दिलेल्या या उत्तराबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु आज स्वातंत्र्य दिन आहे, नंतर बोलू असे सांगत अजितदादांनी उत्तर देण्याचे टाळले.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच राज्यपालांनी सत्तेत सहभागी पक्ष असणाऱ्या काँग्रेस च्या एका नेत्याला  चांगलेच खडे बोल सुनावले असल्यामुळे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्यपालांनी सुनावलेले खडे बोल व संबंधित काँग्रेस नेता मात्र कार्यक्रमानंतर चांगलेच चर्चेत आल्याचे पहावयास मिळाले.