उजनी धरणाची उंची वाढवण्याचा पर्याय शोधुन राष्ट्रवादीचे नेते उठले धरणग्रस्तांच्या मुळावर , राहिली नाही कुणात पवारांना विरोध करण्याची हिंमत, पाणी चोरांना मुकसंमती, रयतक्रांतीचा तीव्र विरोध  

उजनी धरणाची उंची वाढवण्याचा पर्याय शोधुन राष्ट्रवादीचे नेते उठले धरणग्रस्तांच्या मुळावर , राहिली नाही कुणात पवारांना विरोध करण्याची हिंमत, पाणी चोरांना मुकसंमती, रयतक्रांतीचा तीव्र विरोध  
 
टेंभूर्णी,टीम----
उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याची परवानगी मिळाली.सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा रयत क्रांती संघटना व उजनी धरण पाणी बचाव संघटनेने आंदोलन करीत विरोध दर्शविला.परंतु सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उजनी धरणाची उंची वाढवण्यासंबधी जे सुतोवाच केले त्या भूमिकेला  संघटनेच्या वतीने  विरोध करीत उजनी धरणग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही, उजनी धरणाची उंची वाढवण्याचा पर्याय शोधुन राष्ट्रवादीचे नेते धरणग्रस्तांच्या मुळावरच आल्यासारखे झाले आहेत.असे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी सांगितले.

या वेळी पाटील पुढे म्हणाले की,उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी १९७६ लाच संपादित झाल्या आहेत.त्याचवेळी जमीनीचे संपादन झाले.सध्या उजनी धरण ग्रस्तांच्या ज्या पूर्वी संपादन केलेल्या जमिनी आहेत.त्यावर सरकारी संपादन असे नाव असले तरी आज मुळ धरण ग्रस्त शेतकरी स्वतःची जमीन कसत आहेत. त्यामुळे उजनी धरणाची उंची वाढवण्यासाठी कोणताही उजनी धरण ग्रस्त बॅकवॉटर वरील शेतकरी आपली स्वतःची संपादित जमीन (फक्त सातबारा स्वतःचे नावे नसलेली) तो कधीही संपादित करून देणार नाही. त्यासाठी उजनी धरण ग्रस्त वेगळा लढा उभा करतील. त्यामुळे उजनी धरणाची उंची वाढवण्याचा जो कोणी प्रयत्न करेल, किंवा प्रस्ताव आणेल,त्यास आमचा पूर्णपणे विरोध राहील. राष्ट्रवादी पक्षाचे मा. आ. राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उजनीधरणातुन ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेला विरोध करताना,त्यांनी ज्या शेतकर्‍यांचे उजनी धरण होतानाचे योगदान आहे,त्यांच्याच मुळावर आपली भूमिका मांडली. उजनी धरणामध्ये  इतर ठिकाणांवरून पाणी आणन्याबद्दल ते बोलत नाहीत,उजनीतला गाळ काढुन पाणी वाढवण्यावर पण ते बोलले नाहीत.

आज ते उजनी धरणाच्या गेटची उंची १ मीटरने वाढवली पाहिजे. असे म्हणत आहेत. त्यामुळे १२ टीएमसी पाणी वाढेल,त्यातून ५ टीएमसी इंदापूर ला द्या.व बॅकवॉटर वाल्यांनी चुकीचा विरोध केला म्हणत आहेत.अगोदरच शेतकरी धरणग्रस्त झाले आहेत.शेतकर्‍यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले आहे.१९९३ ला त्यावेळी बॅकवॉटरच्या सर्व शेतकर्‍यांनी विरोध केला होता. म्हणून धरणाच्या गेटची उंची वाढवण्याचे काम थांबलं होते.
आताही मा.आ.राजन पाटील धरणाच्या गेटची उंची वाढवण्याचे समर्थन करीत आहेत. ते चुकीचं सांगत आहेत,की ११७ टीएमसी असणारं धरण ११० टक्के पाणी अडवलं जातं व १२३ टीएमसी पाणी अडवलं जातं. अजून जर १२ टीएमसी पाणी अडवलं व गेटची उंची १ मीटरने वाढवून १२ टीएमसी पाणी वाढ होऊन एकुण १३५ टीएमसी पाणी उजनीत साठवता येईल.यामुळे माढा, करमाळा तालुक्यातील शेती,रस्ते आणि पुन्हा काही गावे पाण्याखाली जातील. बऱ्याच ठिकाणी अस होणार आहे.
उजनी धरणासाठी शेतकर्‍यांनी आपल्या जमीनी,घरेदारे व गावांचा त्याग करून धरण स्थापनेमध्ये योगदान आहे.सध्या उर्वरीत जमीनीमध्ये कष्ट करून उदरनिर्वाह करतो आहे.धरणाची उंची वाढवण्याच्या बातमीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.भयभित झाला आहे. जिल्ह्यातील नेत्यांना कृष्णा नदीतून, निरेतून पाणी आणायला नको,पाणी बाहेरून आणायला नको, हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. जिल्ह्यातील नेत्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांना विरोध करण्याची हिम्मत नाही.म्हणून हा पर्याय सुचवून त्यांनी एक प्रकारे मुक संमतीच दिलेली आहे.याला उजनी बॅकवॉटर वरील सर्व धरणग्रस्तांचा विरोध असणार आहे.वेळप्रसंगी रक्त सांडु पण उजनी धरणाच्या गेटची उंची वाढवून देणार नाही असे रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.