ज्यांच्या जीवावर राजकारण केले त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला लाज कशी वाटत नाही,स्वाभिमानाचे रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल

ज्यांच्या जीवावर राजकारण केले त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला लाज कशी वाटत नाही,स्वाभिमानाचे रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल

स्वाभिमानीचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ तनाळी व तपकिरी शेटफळ येथे प्रचार सभा

पंढरपूर,टीम----

  शेतकऱ्यांची ऊसबिले न देणाऱ्या कारखानदारांना लाज कशी वाटत नाही, बिलासाठी विठ्ठल कारखान्यावर उपोषणाला बसणार् या शेतकऱ्याला पोलीस ताब्यात घेतात. काय चूक आहे त्यांची ? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आमदार भारत भालके यांनी राजकारण केले, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे काम चेअरमन यांनी करणे म्हणजे राजकारण नव्हे, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.                                  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ तपकिरी शेटफळ, तनाळी येथे आयोजित प्रचारसभेत तुपकर बोलत होते. यावेळी स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष, जि.प.सदस्य दामोदर इंगोले, माजी उपसभापती विष्णुपंत बागल, युवा आघाडी संघटक शहाजहान शेख यांनी विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा आघाडी प्रवक्ता रणजित बागल, युवा नेत्या गीतांजली बागल, सोमनाथ घोगरे नानासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. 
या वेळी पुढे बोलताना तुपकर म्हणाले की,कारखानदार विरुद्ध सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अशी यावेळची लढाई आहे. एका बाजूला धनदांडगे तर दुसर्‍या बाजूला लोकवर्गणीतून निवडणूक लढविणारा उमेदवार सचिन शिंदे आहे. या लढाईमध्ये स्वाभिमानी ला साथ देतील असा विश्वास तुपकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दामोदर इंगोले यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ द्यावी असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी स्वाभिमानीचे पदाधिकारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

** स्वाभिमानी यापुढील काळात अधिक आक्रमक होणार: 

केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकार तसेच राज्यातील आघाडी सरकारने ही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी यापुढील काळात अधिक आक्रमक होणार असल्याचे माजी उपसभापती विष्णू बागल यांनी सांगितले.