दादा आता आमच्या चेअरमन साहेबांकडे विशेष लक्ष राहू,भगीरथ दादांची अजितदादांना साद
पंढरपूर,टीम---
सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे पंढरपूर तालुका व विठ्ठल परिवार अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होता क्षण आज उपमुख्यमंत्री अजित दादा पवार त्यांच्या समोर घडत आहे.कै. वसंत दादा,यशवंत भाऊ,औदुंबर आण्णा,व स्व.भारत नाना यांनी हा परिवार नेहमी एकसंघ राहिला पाहिजे ही भूमिका घेतली आहे.तीच भूमिका ठेवत नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले.आज काळे साहेबांच्या प्रवेशा मुळे शेतकऱ्यांना व खऱ्या अर्थाने मला वडीलकीच मोठं बळ व आशीर्वाद मला मिळाला आहे.असे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सांगितले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे,दीपक साळुंखे, उमेश पाटील, भैरवनाथ शुगर व्हा. चेअरमन अनिल सावंत,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, समाधान काळे,यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी पूढे बोलतांना उमेदवार भगीरथ भालके म्हणाले की,नानांच्या जाण्यानंतर सर्वसामान्य जनता,जेष्ठ नागरिक,गोरगरीब जनता यांनी सर्वांनी मला मोठा आधार दिला.मुंबई, पुणे व ज्या ज्या वेळेस कारखाण्याच्या व इतर अडचणी संदर्भांत मी मुंबई, पुणे येथो आदरणीय पवार साहेब दादा यांच्या कडे गेलो त्या वेळेस माझ्या हाताला धरून चेअरमन साहेबांनी मला बोटाला धरून वडीलकीची साथ व डोक्यावर आशीर्वाद देण्याचं काम पार पाडले त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आपल्या परिवारासोबत राष्ट्रवादीला मोठा बळकटी मिळणार आहे.पवार साहेब व दादा यांचे नेहमीच नानांवर व आपल्या सर्वांवर लक्ष असायचे त्यामुळे दादा आता आमच्या चेअरमन साहेबांवर ही तुमच विशेष लक्ष असू द्या .कारण त्याचा वडीलकीची साथ माझ्या सोबत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथून पुढे आम्ही काम करणार आहोत असे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सांगितले.
या सभेला सहकार शिरोमणी,सीताराम कारखान्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, विठठल परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.