चक्क राहुल गांधींनी मारली समुद्रात उडी, घेतला मासेमारीचा अनुभव
केरळ मध्ये घेतला मासेमारीचा अनुभव
तिरुअनंतपुरम,टीम---
मोदी सरकारला सतत धारेवर धरणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सतत अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहत असतात.ते आजकाल टी शर्ट, जीन्स पॅन्ट अशा विविध मॉर्डन लूकमध्ये दिसत असून कधी परदेशातील फोटो टाकून सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेत असतात.राहुल गांधी सध्या केरळमध्ये असून ते तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, येथे सध्या यांची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा होत आहे. केरळमधील कोल्लम येथे त्यांनी थेट पाण्यात उतरुन मच्छीमारांसोबत मासेमारी केली. मासेमारी कशी केली जाते याबाबत जाणून घेतले. सुरक्षा रक्षकांचा ताफा भेदून त्यांनी मच्छीमारांसोबत पाण्यात मासेमारी केल्यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.राहुल गांधी यांच्या हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आले आहेत.
काँग्रेसचे व देशातील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असल्यामुळे राहुल गांधी यांच्या चारही बाजूंना सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा असतो. राहुल गांधी जिथे जातील तिथे या सुरक्षा रक्षकांकडून त्यांना संरक्षण दिले जाते. मात्र सध्या केरळच्या दौऱ्यावर असल्यामुळे राहुल गांधी सुरक्षेची तमा न बाळगता तेथील जनतेशी समरस होण्याचा प्रयत्न करत आहेत.ते केरळमधील जनतेशी मुक्तपणे संवाद साधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी थेट पाण्यात उतरुण कोल्लम येथील स्थानिक मच्छीमारांसोबत मासेमारी केली. त्यांनी पाण्यामध्ये उतरुन मासेमारी नेमकी कशी करतात, हे अनुभवले. त्यांनी स्व:तसुद्धा मासेमारी केली. यावेळी बोटीतून उडी घेताना, तसेच समुद्रात मच्छीमारांसोबत मासेमारी करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
राजकारणात राहुल गांधी यांचा भाग्योदय कधी होणार याप्रमाणेच त्यांचे लग्न कधी होणार, याचीही सर्वांना मोठी उत्सुकता आहे. राहुल गांधी यांनी या बाबत आजपर्यंत मौन बाळगणेच पसंत केले आहे. मात्र, पुदुचेरीत झालेल्या एका कार्यक्रमात एका लहान मुलीने सर्वांदेखत राहुल गांधी यांना ‘तुमची गर्लफ्रेंड आहे का?’, असा प्रश्न विचारला.तेव्हा या प्रश्नाचे उत्तर मी कधी तरी देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंजवल्या आहेत.त्यामुळे लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करून समाचार घेणाऱ्या राहुल गांधी यांचा हा केरळ दौरा सध्या मोठा चर्चेत राहत असून त्यांनी मारलेल्या समुद्रातील उडीचीही मात्र चांगली चर्चा होत असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर ही जबरदस्त पणे व्हायरल झाले आहे.