पंढरपूर विषय समित्यांसाठी झाली नव्या कारभाऱ्यांची निवड

पंढरपूर विषय समित्यांसाठी झाली नव्या कारभाऱ्यांची निवड

पंढरपूर नगर परिषदेसाठी विषय समिती च्या नव्या कारभारी मंडळींची आज निवड करण्यात आली आहे.यामध्ये बांधकाम सभापती समिती च्या सभापतीपदी सुरेश नेहतराव,पाणीपुरवठा सभापती संजय निंबाळकर, स्वच्छता वैद्यकीय आरोग्य विक्रम शिरसाठ,महिला बालकल्याण मालनताई देवमारे, तर शिक्षण समितीच्या सभापतिपदी शकुंतला नडगिरे यांना संधी देण्यात आली आहे.या नव्या निवडींबदल आ. प्रशांत परिचारक, युटोपीएन चे चेअरमन उमेश परिचारक,नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांनी अभिनंदन केले आहे.