पँटच्या खिशात मोबाईल होता स्विच ऑफ,अचानक झाला स्फोट,नगरसेविकेच्या पतीच्या पायाला दुखापत,मोठा अनर्थ टळला
श्रीगोंदा,टीम------
सध्या मोबाईल हा जीवनातील एक अति महत्वाचा भाग बनत आहे.परंतु हाच मोबाईल कधी कधी जीवघेणा व धोकेदायक ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे.कारण एक धक्कादायक घटना श्रीगोंदा येथे घडली आहे.शहरातील नगरसेविका सीमाताई गोरे यांचे पती प्रशांत गोरे यांच्या पँटच्या खिशात असलेल्या एका प्रसिद्ध 2 अक्षरी कंपनीच्या मोबाईलचा सायंकाळी अचानक स्फोट झाला यात गोरे यांच्या पायाला दोन ठिकाणी भाजले आहे.मात्र सुदैवाने यात गोरे यांना जास्त दुखापत झालेली नाही पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रशांत गोरे हे पेडगाव रस्त्यावर एका व्यक्तीशी बोलत होते. याच दरम्यान अचानक त्यांच्या पँटच्या खिशातील मोबाईल मॉडेल वाय ७१ चा अचानक स्फोट झाला.व अचानक खिशातील मोबाईलने पेट घेतला. परंतु गोरे यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे यात त्यांना जास्त दुखापत झाली नाही, यात मोबाईलचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या आवाजाने बाजूला उभे असलेले लोक धावत त्याठिकाणी जमा झाले. हा मोबाईल स्विच ऑफ होता तरीसुद्धा त्याचा असा स्फोट झाला हे विशेष आहे.त्यानंतर गोरे यांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले सुदैवाने गोरे यांना यात जास्त दुखापत झालेली नाही.
स्विच ऑफ असतानाही एका प्रसिद्ध कंपनीच्या मोबाईलचा पॅन्ट च्या खिश्यात स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मोबाईलचा स्फोट होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.