तलाठि भाऊसाहेबांना नोंदीची अॅलर्जी, धोंडेवाडी ग्रामस्थांसाठी झाली डोकेदुखी
पंढरपूर,टीम
गावचा सातबारा व इतर काही शासकिय माहीती जाणून घ्यायची असेल तर सर्वात अगोदर तलाठ्याकडे जावे लागत असते.त्यामुळे या भाऊसाहेब मंडळींना गावात मोठा मानसन्मान असतो. कालच्या आणी आजच्या आधुनिक व डिजीटल स्वाक्षरीच्या युगातही हा मान सन्मान अनेक गावांमध्ये टिकून आहे.परंतु तरीही ग्रामस्थांसोबत उद्धट वर्तन व वागणुक देवून त्यांना कार्यालयाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम धोंडेवाडी ता.पंढरपूर येथिल भाऊसाहेबांकडून होत असल्यामुळे एक दोन नव्हे तर तब्बल १२५ ग्रामस्थांनी याबाबत निवदेन दिले असून नोंदींची अॅर्लजी असलेल्या त्या भाऊसाहेबांवर महसूल प्रशासन कारवाई कधी करणार ? या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
धोंडेवाडी ता.पंढरपूर हे गाव जवळपास ९८ टक्के बागायती गाव आहे.त्यामुळे गावातील नागरीकांना विविध कारणांसाठी सातबारा उतारे व इतर कागदपत्रे लागत असतात.परंतु येथील तलाठी भाऊसाहेब नेहमीच आपल्या एका वेगळ्याच तोर्यात असतात.ग्रामस्थांना निट उत्तरे न देता लेखी द्यायला मी काय राष्ट्रपती आहे का? कुणाकडे जायचे तीकडे जावा अशी उद्धट उत्तरे देवून कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवत असतात.या बाबत "व्हिजन वार्ता न्यूज" ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गावातुन अनेकांनी फोन करुन आमच्या प्रतिनिधी कडे सतत पाठपुरावा करुनही आमच्या नोंदी घेतल्या जात नाहीत,अनेक दिवसांपासून नव्हे तर आम्ही गेल्या काही वर्षांपासून पाठपुरवठा करीत आहोत,आमच्या वारस्याच्या नोंदी योग्य कागदपत्रे असतांनाही घेतल्या जात नाहीत,काही नोंदीबाबत तर आदेश असतांना त्या धरतांना अनेक कारणे सांगुण टाळाटाळ केली जात आहे,उडवाउडवीची उत्तरे देवून कार्यालयाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो.काही बोलू दिले जात नाही अशा विविध तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. त्यामुळे या भाऊसाहेबांना नोंदीची अॅलर्जी असल्याचे दिसून आले.कारण सरकारी काम व सहा महीने थांब अशी एक म्हण प्रजलित आहे परंतु धोंडेवाडीत मात्र सहा महिने नव्हे तर अक्षरश: सरकारी काम व वर्षांनु वर्ष थांब व ऑफिसच्या बाहेर जा असा प्रकार सुरु आहे.याबाबत गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी व तहसिलदार यांना दि.१ मार्च रोजी निवेदन दिले आहे.अद्यापर्यत संबधित भाऊसाहेबांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.कारण तहसिल प्रशासनाकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.शासकिय कामे वेळेत करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार अधिकारी व कर्मचार्यांसाठी नियमावली तयार करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र दुसरीकडे सरकारच्या नियमांना पायदळी तुडवून सर्वसामान्य जनतेला वेठिस धरण्याचे काम आजच्या डिजीटल युगात होत आहे. त्यामुळे नोंदींची अॅलर्जी असलेल्या या भाऊसाहेबांची त्वरीत बदली करुन गावाला नविन संगणकिय ज्ञान असलेला तलाठी द्यावा अन्यथा ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
***-ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार चौकशी सुरु करण्यात आली असून संबधित तलाठ्याचे काय म्हणणे आहे हे ही जाणून घेतले जाणार आहे त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल----सुशिल बेल्हेकर,तहसिलदार,पंढरपूर