आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात राहुल गांधी यांची भव्य जाहीर सभा,सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते स्टेजचे पूजन, जय्यत तयारी

आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात राहुल गांधी यांची भव्य जाहीर सभा,सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते स्टेजचे पूजन, जय्यत तयारी

सोलापूर,टीम ------

सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून सोलापूरची लेक म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही सभा बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे दुपारी 3 वाजता होणार आहे.
या भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून आज रोजी स्टेजचे पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, आदी उपस्थित होते.