रहदारीच्या चौकातील त्या कचराकुंडीवर गाढवासह मुक्या जनावरांनी  मारला ताव, गजानन महाराज मठासमोरील धक्कादायक प्रकार

रहदारीच्या चौकातील त्या कचराकुंडीवर गाढवासह मुक्या जनावरांनी  मारला ताव, गजानन महाराज मठासमोरील धक्कादायक प्रकार

पंढरपूर,टीम------

संत भूमी पंढरी नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भावीक भक्त सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात यामधील निम्म्याहून अधिक भाविक संत गजानन महाराज मठामध्ये मुक्कामी थांबत असतात परंतु या भाविकांना सावळ्या विठ्ठलाच्या दर्शना अगोदर कचराकुंडीतून ओव्हर  फ्लो झालेला  कचरा पायदळी तुडवत तुडवत विठुरायाच्या दर्शनासाठी जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे भक्तांमधून मोठी नाराजी व्यक्त केले जात आहे.


स्वच्छ पंढरपूर व सुंदर पंढरपूर हे ब्रीदवाक्य हाताशी धरून पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर शहरांमध्ये स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे परंतु ज्या चौकामध्ये नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक गर्दी असते,वाहतूक कोंडी असते,त्याच चौकातील रस्त्यावर असलेल्या कचरा कुंडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
 गजानन महाराज मठा समोरील कचराकुंडी ही नेहमी  रस्त्यावर सांडत असते,त्यामुळे येथे गाढवा सह मुके  प्राणी  मनसोक्त पणे कचऱ्यावर ताव मारत असतात यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी व लहान-मोठे अपघातही झाले आहेत परंतु तरीही प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे .


 हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे सदर कचराकुंडी येथून काढून टाकावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे,कारण ही कचराकुंडी गजानन महाराज मठाच्या अगदी  गेट समोर आहे. त्यामुळे भक्तांना मठामधून  बाहेर पडल्या पडल्या कचराकुंडीचे विदारक चित्र पहावयास मिळत असते.  


गजानन महाराज मठ समोरील रस्त्यावरून नगरपरिषदेचे अनेक आजी,माजी पदाधिकारी  व काही प्रशासकीय अधिकारीही दररोज येजा करत असतात त्यांचेही या कचराकुंडीकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण असाच प्रकार पंढरपूर शहरात सुरू असल्याचे बोलले जात आहे.