पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील जनतेला मिळाली भारत कृषी महोत्सवात अनोखी संजीवनी,भारत नानांच्या छाव्याने फुंकले रणशिंग,राजकीय वातावरण झाले ताईट

पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील जनतेला मिळाली भारत कृषी महोत्सवात अनोखी संजीवनी,भारत नानांच्या छाव्याने फुंकले रणशिंग,राजकीय वातावरण झाले ताईट

"मराठी पाऊल पडते पुढे " या मराठमोळ्या कार्यक्रमाने भारत कृषी महोत्सवाची सांगता.

पंढरपूर,टीम--------- 
 
दि.23 ते 26 फेब्रुवारी पर्यंत सुरू असलेल्या  भारत कृषी महोत्सवाची सांगता "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमाने झाली. मराठी पाऊल पडते पुढे या मराठमोळ्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा, महान राष्ट्रीय महामानवानी दिलेला महान सांस्कृतिक वारसा पुढे चालवण्यासाठी मराठी माणसाने सातत्याने आग्रही राहून माय मराठीची उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे.या हेतूने हा मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आ.भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.या महोत्सवात 2 कोटीचा गजेंद्र रेडा व 3 फूट उंचीची पुंगणुर गाय विशेष आकर्षण ठरली.शेतकरी मेळाव्याचे आयोजन झाल्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळाली,तर डॉ. प्रणिताताई भालके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली.या महोत्सवामध्ये पंढरपूर शहर,ग्रामीण व मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली.यामुळे महोत्सवाच्या निमित्ताने भगीरथ भालके यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे पहावयास मिळत आहे.कारण आता काहीही झाले तरी माघार नाही असा निर्धार घेऊन भगीरथ भालके मैदानात आले असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


मराठी,चालीरिती,परंपरा, मराठी माणसांची शौर्यगाथा,शेतकरी कष्टकरी यांचे जीवनमान तसेच महाराष्ट्रामध्ये रुजलेली लोकगीते, अभंग, महापुरुषांची यशोगाथा, पोवाडे ग्रामीण भागामध्ये परंपरेने चालत आलेले जात्यावरची गाणी, संपूर्ण गावाला जागे करणारे वासुदेव गीते, कोळीगीते, भावगीते, भक्तीगीते अशा विविध कलागुणांनी भरलेली महाराष्ट्रातील मातीमध्ये रुजलेली अशी गाणी मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमामधून या भारत कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर करण्यात आली.


     या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसिलदार सचिन लंगुटे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी व मान्यवर  उपस्थित होते.


या कार्यक्रमाला पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील शेतकरी, महिला,कष्टकरी, सुशिक्षित,मध्यमवर्गीय सर्व स्तरातील प्रेक्षकांनी तसेच महिलांनी,बाळ गोपाळ यांनी उपस्थिती दर्शवली. 


या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आ.भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने युवक नेते भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या महोत्सवामुळे विठ्ठल परिवारा मध्ये पुन्हा नवचैतन्य संचारले असून परिवारातील "एकजूट"या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पंढरपूर शहर व मंगळवेढ्यातील जनतेला पहावयास मिळाली.