राज ठाकरेंच्या मनसेने पंढरपूरकरांचे वाचवले लाखो रुपये, दिला मोठा दिलासा,अखेर नगरपरिषदेला आला आदेश,निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांचा बापूंनी केला करेक्ट कार्यक्रम

राज ठाकरेंच्या मनसेने पंढरपूरकरांचे वाचवले लाखो रुपये, दिला मोठा दिलासा,अखेर नगरपरिषदेला आला आदेश,निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांचा बापूंनी केला करेक्ट कार्यक्रम

अखेर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी करून दाखवलं

पंढरपूर,टीम------


पंढरपुर नगर पालिकेने चतुर्थ वार्षिक करनिर्धारणाच्या नावाखाली शहरातील मालमत्ता धारकांवर करवाढीचा मोठा बोजा टाकण्याचा निर्णय घेतला होता.शहरातील अनेक मालमत्ता धारकांना १५ टक्के ते ८० टक्के पर्यंत करवाढीचा नोटीस देण्यात आल्या होत्या.तर हरकती दाखल करण्यासाठी देखील अगदी कमी कालावधी दिला होता.याबाबत शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.यामुळे यामुळे सर्वसामान्य पंढरपूरकरांना या जुलमी करवाढी पासून वाचवण्यासाठी मनसे सह विविध पक्ष संघटनांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये मनसेला सर्वात मोठे यश मिळाले असून पंढरपूरकरांना मनसेने मोठा दिलासा दिला आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सदर कर वाढ रद्द करण्याचे लेखी आदेश निर्गमित केले आहेत.

एकीकडे शहरात नगर पालिका प्रशासन व माजी सत्ताधारी शहरातील नागरिकांना अगदी मूलभूत सुविधा देण्यात,स्वछ आणि पुरेसा पिण्याचा पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरलेले असताना,शहरातील बागा कुलूपबंद असताना,रस्ते धुळीने माखलेले असताना,अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर,अतिक्रमण करून व्यापलेले फुटपाथ अशी परिस्थिती असताना हि करवाढ केली जात असल्याने नागरीकातून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला होता.यातूनच विविध पक्ष संघटना यांनी मोर्चे आंदोलने केली, तर मनसेने पंढरपुर नगर पालिकेवर प्रचंड मोर्चा काढण्या बरोबरच थेट मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शासन स्तरावर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्रावर दिनांक १८ डिसेंबर रोजी अंतरिम स्थगितीचा आदेश नगर पालिकेने काढला होता. अखेर दिनांक ७ फेब्रुवारी रोजी नगर विकास विभागाने पंढरपूर नगर पालिकेस पत्र देत सदर करवाढ मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हरकतीचा संदर्भ देत स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे मनसे चे नेते दिलीप धोत्रे यांचा पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला असून राज ठाकरेंच्या मनसेने दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून पंढरपूरकरांची मने जिंकली असल्याचेही बोलले जात असून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीपूर्वी मनसेच्या दिलीप बापूंनी सत्ताधाऱ्यांच्या करेक्ट कार्यक्रम केल्याचेही पहावयास मिळत आहे.