बिर्याणीचा शिल्लक मलिदा घेतोय वाहनधारकांचा जीव, प्रशासनाचे दुर्लक्ष,व्हीआयपी रोड वरील धक्कादायक प्रकार

बिर्याणीचा शिल्लक मलिदा घेतोय वाहनधारकांचा जीव, प्रशासनाचे दुर्लक्ष,व्हीआयपी रोड वरील धक्कादायक प्रकार

पंढरपूर,टीम-----

 शहरांमधील सर्वात गजबजलेला परिसर म्हणून व्हीआयपी रोड ओळखला जातो.परंतु सध्या या रोडवरील एका डिव्हायडरला रोज बिर्याणी व जायकाचा शिल्लक मलिदा मिळत असल्यामुळे येथील डिव्हायडर हा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तालुका पोलीस स्टेशन पासून ते नवीन कराड नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणात व्हीआयपी रोडवर वाहनांची गर्दी असते याच रोडवर रेल्वे मैदानाच्या समोर एक डिव्हायडर बनवण्यात आला आहे परंतु या डिव्हायडरवर खुलेआम पणे, कुणाचाही मुलाजमा न बाळगता रेल्वे गेटच्या समोर असलेल्या बिर्याणी व जायकाच्या दुकानांमधून शिल्लक राहिलेला मलिदा, मटणाचे उष्टे पाणी टाकले जाते त्यामुळे तेथे सतत भटक्या कुत्र्यांची गर्दी असते या कुत्र्यांमुळेच नेहमी तेथे अपघात घडत आहेत.


 गुरुवारी दुपारी कोर्टी येथील एक तरुणाचा मोठा अपघात झाला, सुदैवाने नसीब बलवत्तर म्हणून तरुण वाचला. कुत्रे आडवे आल्यामुळे तरुण रस्त्यावर पडला व जवळपास शंभर ते दोनशे फूट फरपटत गेला याबाबत तेथील काही वाहनधारकांनी बिर्याणी व जायका दुकानदारांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु  सर्वजण या डिव्हायडरवर घाण टाकतात मी एकटा टाकत नाही असे उर्मट उत्तर दिले गेले सदर दुकानदार हे अतिक्रमण करून रस्त्यावर बिनधास्तपणे बिर्याणी मटन विक्री करत आहेत. त्यांना अनेकदा प्रशासनाने कारवाईचा बडगा दाखवला आहे पण त्यांचा उर्मटपणा कायम असल्यामुळे याचा नाहक त्रास दुचाकी वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. 
या दुकानांवर दुकानांवर कायमस्वरूपी कारवाई करा अशी मागणी वारंवार नागरिकांमधून होत असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे कदाचित येथील बिर्याणी व जायका राईस ची  प्रशासनातील अधिकाऱ्यांना भुरळ पडली की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलीस,नगरपरिषद,बांधकाम विभाग गप्प

येथील बिर्याणी व जायका विक्रेते रात्री 10 नंतरही खुलेआम पणे आपली दुकाने सुरू ठेवत असतात,त्यामुळे येथे नेहमी वाहनांची मोठी गर्दी असते.परंतु याकडे नगरपरिषद,पोलीस व बांधकाम विभाग हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या रोडवरून या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी सतत येजा करत असतात तरीही कारवाईचे धाडस कोणाकडूनही होत नाही त्यामुळे कदाचित त्यांनाच बिर्याणीचा मोफत प्रसाद मिळतो की काय ?असाही सवाल उपस्थित होत आहे.