पंढरीत पोलिसांच्या दारात अतिक्रमणाचा विळखा,वाहतुकीचा खेळखंडोबा,गोरगरिबांना मात्र दंडुका

पंढरीत पोलिसांच्या दारात अतिक्रमणाचा विळखा,वाहतुकीचा खेळखंडोबा,गोरगरिबांना मात्र दंडुका

पंढरपूर,टीम-----

शहरामध्ये सध्या कार्तिकी यात्रा निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी भक्त जमा होऊ लागले आहेत. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी प्रशासनही जय्यत तयारी करत आहे,या तयारीचाच एक भाग म्हणून नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचने नुसार शहरात अतिक्रमण हटाव आता मोहीम सुरू केली आहे, परंतु या मोहिमेत मोठी वसुली बाजी होत असल्याचे पहावयास मिळत आहे .कारण चक्का पोलिसांच्याच दारात अतिक्रमण झाले आहे.

 पंढरीत येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर असलेल्या फुटपाट वरील अतिक्रमण काढले जात आहे.फळ विक्रेते,कपडे विक्रेते यांना बाजूला केले जात आहे,परंतु जे पोलीस स्टेशन पंढरपूर शहराच्या रक्षणासाठी आहे त्याच पोलीस स्टेशनच्या दारामध्ये पोलिसांचे साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तेथे साहित्य विक्रीचा धंदा सुरू केल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या अतिक्रमणावर दंडू का आणि आपल्या दारात मात्र वशिल्याचा मलिदा हा प्रकार सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

वास्तविक पाहता जे पोलीस अधिकारी व कर्मचारी नगरपरिषदेच्या मदतीने शहरातील फूटपाटवर बसलेल्या गोरगरिबांच्या अतिक्रमण काढून घेत आहेत त्या पोलिसांचे व नगरपरिषद प्रशासनाचे शहर पोलीस स्टेशनच्या फुटपाटवर असलेल्या अतिक्रमाकडे दुर्लक्ष का? होत आहे हा सवाल  उपस्थित होत आहे.शहर पोलीस स्टेशनच्या दोन्ही बाजूच्या फुटपाटवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून या ठिकाणी दुचाकी व चार चाकी गाड्यांचे ही  पार्किंग केले असल्यामुळे शहर पोलीस स्टेशन समोर सतत वाहतूक कोंडी होत आहे.शहराला शिस्त लावणारी वाहतूक शाखा आता गेली कुठे हा सवाल यामुळे उपस्थित होत आहे,कारण पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना दंड करण्याचा अधिकार आहे का?

अतिक्रमणातील ही वशिलेबाजी पांडुरंगाच्या दारात चुकीची  असल्याचेही काही भाविकांमधून बोलले जात आहे, पोलिसांचे साहित्य विक्रेत्यांना पोलिसांकडूनच अतिक्रमण करण्यात जर पाठबळ दिले जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांवर  दंडूका उगारून त्यांचे अतिक्रमण काढण्याचा यांना नैतिक अधिकार आहे का? हा ही सवाल उपस्थित असून यात्रा बंदोबस्ताच्या निमित्ताने शहरात आलेल्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्याचे  दुर्लक्ष का होत आहे याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे.