भाविकांना मंदिर समितीकडून दर्शन रांगेत कुलर ,फॅन,पायाखाली मॅट ,मंडपाची व्यवस्था,कार्तिकी साठी प्रशासन सज्ज

भाविकांना मंदिर समितीकडून दर्शन रांगेत कुलर ,फॅन,पायाखाली मॅट ,मंडपाची व्यवस्था,कार्तिकी साठी प्रशासन सज्ज

वारी कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची
जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी


पंढरपूर,टीम-----

कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी असून, यात्रा कालावधी दि.23 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. यात्रा कालवधीत मंदीर समिती तसेच प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली.
                         कार्तिकी एकादशीचा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपुरात मोठ्या प्रमाणत भाविक दाखल झाले आहे. भाविकांना सहज आणि सुलभरित्या दर्शन मिळावे यासाठी मंदीर समिती कडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. मंदिर समितीकडून  दर्शन रांगेत कुलर ,फॅन , पायाखाली मॅट ,मंडपाची व्यवस्था तसेच पोलीस सुरक्षासह वैद्यकीय यंत्रणा लाईव्ह दर्शन व्यवस्था तसेच प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी  जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली.तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी वारकरी व भाविकांच्या सुरेक्षेसाठी  पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.


             यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड, विश्रांतीकक्ष, दर्शनरांग, 65 एकर, महाआरोग्य शिबिर, वाखरी येथील पाहणी करुन संबिधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव,प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव,कार्यकारी अभियंता अमित निंबकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य डॉ. एकनाथ बोधले, तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.


             यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी प्रशासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर समितीकडून वारकरी-भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. तसेच नगरपालिका प्रशासनाकडून 65 एकर, वाळवंट,पत्राशेड तसेच  शहरात आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा, अतिक्रमण मोहिम, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदी बाबत माहिती दिली.