दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा,आ समाधान आवताडे झाले आक्रमक

दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा,आ समाधान आवताडे झाले आक्रमक

महसूल मंत्रांना दिले पत्र

पंढरपूर,टीम-----
पंढरपूर मतदारसंघात दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा उपजीविकेचा व्यवसाय आहे, दोन महिन्यांपूर्वी ३.५/८.५ गुणवत्तेला ३९ ते ४० रुपये दुधाचा दर मिळत होता मात्र सध्या तो दर कमी होऊन 25 ते 28 रुपयापर्यंत खाली आला आहे त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला असून उत्पादन खर्चही निघेना असे झाला आहे,तरी शासनाने ठरवून दिलेला किमान 34 रुपये इतका दर दूध उत्पादकांना देण्यात यावा अशी मागणी आ.समाधान आवताडे यांनी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे केली आहे.
 सध्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीकडून कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे उपजीविकेसाठी शेतकरी मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत मात्र चाऱ्याचे वाढलेले दर पशुखाद्याचे वाढलेले दर पाहता प्रति लिटर उत्पादन खर्च 35 रुपयापर्यंत जात आहे आणि हाती दर 25 ते 28 रुपये मिळत असल्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शासनाने नेमलेल्या दूध दर समितीने 34 रुपये दर जाहीर करून सुद्धा खाजगी दूध संघ हा दर देण्यामध्ये असमर्थता दाखवत आहेत तरी आपण लक्ष घालून समितीची पुन्हा बैठक लावावी व तात्काळ दूध दराविषयीचा तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशा आशयाचे पत्र देऊन आ.आवताडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दूधदर वाढवण्यासंदर्भात मागणी केलेली आहे.