जोरदार इनकमिंग मुळे मनसेने वाढवले राजकीय पक्षांचे टेन्शन, ठाकरेंच्या सेनेसह सर्वांना दणका
पंढरपूर,टीम-----
सोलापूर जिल्ह्यात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे जोरदार कामगिरी करीत असून आजवर विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रम राबवित त्यांनी पक्षाला चांगलीच उभारी दिली आहे.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात येणार असून कार्यकर्ते व पदाधिकारी कामाला लागले असल्याचे पहावयास मिळत आहे.कारण सध्या मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे.
कुर्डु तालुका माढा येथील शिवसेना(उबाठा) गट प्रमुख शंकर दादा खांडे यांनी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,व्यापारी सेनेचे जिल्हा अध्यक्ष जयवंत भोसले,तालुका अध्यक्ष सागर यांच्यासह अंबाड गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील शिवसेना (उबाठा) गटाचे नारायण गोवे, शंकर भगरे, सुरज काशीद, रोहित शिवशरण ,प्रवीण जाधव,यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, उप तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे इत्यादी उपस्थित होते.