चंदन चोरट्यांनी चक्क पंढरपूर  नगरपरिषदेलाच लावले सणासुदीच्या चंदन

चंदन चोरट्यांनी चक्क पंढरपूर  नगरपरिषदेलाच लावले सणासुदीच्या चंदन

पंढरपूर,टीम---

अज्ञात चंदन चोरट्यांनी यमाई तलाव येथील चंदनाचे झाड तोडून त्यातील चंदनाचा गाभा चोरुन नेला आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास तलाव परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आली असल्यामुळे चक्क पंढरपूर नगरपरिषदेला चंदन चोरांनी सणासुदीच्या काळात चंदन लावले असल्याचे पहावयास मिळत आहे.


नगरपरिषदेच्या मालकीचे असलेल्या यमाई तलाव येथे मोठी वनराई आहे .या वनराईत चंदनाची झाडे आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील एक झाड तोडून चंदन चोरट्यांनी त्यातील चंदनाचे खोड काढून नेले आहे.
इतर झाडे चोरीला जाऊ नये यासाठी नगरपरिषदेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

प्रशासन सुस्त,अधिकारी इतर कामात व्यस्त

या भागात पूर्वी dysp विक्रम कदम व इतर अधिकारी कर्मचारी वर्ग दररोज सकाळी फिरायला जात असायचे ,यामुळे रोड रोमियो व भुरट्या चोरट्यांना चांगली भीती होती,परंतु सध्या नव्याने पंढरीत बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना या भागाकडे अथवा फेर फटका मारण्यासाठी वेळच नसल्याचे दिसत आहे,यामुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.