शिंदे -फडणवीस सरकार कडून मंगळवेढ्यासह संतभूमी पंढरीसाठी आ.समाधान आवतडे यांनी आणला भरघोस निधी,पंढरीच्या विकासात पडणार मोठी भर

शिंदे -फडणवीस सरकार कडून मंगळवेढ्यासह संतभूमी पंढरीसाठी आ.समाधान आवतडे यांनी आणला भरघोस निधी,पंढरीच्या विकासात पडणार मोठी भर
पंढरपूर व मंगळवेढा शहरांचा देखणा कायापालट होण्यासाठी १० कोटी २ लाख निधी मंजूर - आ.आवताडे
पंढरपूर - टीम
  संतांच्या समर्पक आणि भक्ती सिद्धांत कार्यआस्तित्वाने पुनित झालेल्या पंढरपूर व मंगळवेढा शहराच्या पवित्र भुमीचा सर्वांगीण आणि देखणा कायापालट होण्यासाठी व शहरातील विकास कामे गतिमान होण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी व मंगळवेढा नगरपरिषदेस ५ कोटी २ लाख असा दोन्ही शहरांसाठी एकुणात्मक १० कोटी २ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे. आ.अवताडे यांनी पंढरपूर शहरासाठी भरघोस निधी आणल्यामुळे आता आ. अवताडे यांनी पंढरीच्या विकासामध्ये चांगले च लक्ष घातल्याचे ही पहावयास मिळत आहे.
सदर विकास निधी अंतर्गत पंढरपूर शहरामध्ये  प्रभाग क्रमांक १४ जिजाऊनगर अंतर्गत रस्ते करणे - ४० लाख,प्रभाग क्रमांक १२ वाल्मिकीनगर अंतर्गत रस्ते करणे - ४० लाख,प्रभाग ४ लखुबाई मंदिर पाठीमागील परिसर रस्ता काँक्रिटीकरण करणे २५ लाख ,वसंतनगर येथील अंतर्गत रस्ते करणे २५ लाख ,राऊत मळा ते खंडू राऊत घर व खरे मळा ते शेख वकील रस्ता करणे ४० लाख,उमा कॉलेज ते हर्षद मेडिकल पर्यंत रस्ता करणे ४० लाख,अक्षद बेंगलोज मधील अंतर्गत रस्ते करणे २५ लाख, कुष्ठरोगी वसाहत गोपाळपूर नाका येथे लादीकरण करणे पांडुरंग वाडेकर घर राऊळ लादिकरण करणे १० लाख ९) जिजाऊ पुतळा व जिजाऊ उद्यान विकसित करणे १ कोटी, पद्मावती उद्यान विकसित करणे १ कोटी, शिवपार्वती नगर येथील सर्व्हे नंबर १०२ गणेश मंदिर शेजारी सभा मंडप बांधणे व वीर काशीद चौक येथे हायमास्ट बसविणे १३ लाख  हिंदू स्मशानभूमी मध्ये आसन व्यवस्था व सुधारणा विषयक कामे करणे २५ लाख, हजरत बाराइमाम सरकार इमाम बाड दर्गा सोयी - सुविधा व विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे १७ लाख  याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे तर मंगळवेढा शहरातील विविध विकास समाजासाठी मोठ्या प्रमाणात आ.अवताडे यांनी शिंदे फडणवीस सरकारकडून निधी मंजूर करून आणला आहे.
मंगळवेढा शहरासोबत आता पंढरपूरच्या विकासाकरता आ. अवताडे यांनी लक्ष घातले असल्यामुळे  कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे,कारण पुढील काही दिवसात  पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
 राजकारणापलीकडे विकासाची दूरदृष्टी ठेवून आपले विधायक कार्य करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्याची छाप पाडणारे आ. आवताडे यांचे विकासाभिमुख नेतृत्व भरीव निधी मंजूरीमुळे आणखी व्यापक पद्धतीने जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघामध्ये निर्माण झाले आहे.