राज्यातील 22 गावांमध्ये 8 दिवसांचा लॉकडाउन,मोकटांवर दाखल होणार गुन्हे,म्युकर मायकोसिसचा वाढला धोका,लग्न समारंभावर बंदी

राज्यातील 22 गावांमध्ये 8 दिवसांचा लॉकडाउन,मोकटांवर दाखल होणार गुन्हे,म्युकर मायकोसिसचा वाढला धोका,लग्न समारंभावर बंदी

अहमदनगर,टीम-----

कोरोना सोबत आता काही भागात म्युकरमायकोसिसचा मोठा धोका वाढत जात आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील 22 गावांमध्ये 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे.राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  परिस्थितीची दखल घेत कठोर उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे  22 गावांत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.


या लॉकडाउन  सोबत शंभर टक्के चाचण्या तसेच बाहेरुन येणा-यांचं गावातील शाळेत 7 दिवसांचं विलगीकरण करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही.


 विनामास्क फिरणारे, चौकात पारावर विनाकारण बसणारे,  यांचे फोटो काढुन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.येथील रुग्णसंख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत जात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः परिस्थितीची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर   बाहेरुन येणा-यांचं 7 दिवस विलगीकरण सक्तीचं केलं आहे.

या गावात लॉकडाउन---

तालुक्यातील निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव, वाळवणे या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. पुढील आठ दिवस या गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. बाहेरुन आलेले पाहुणे सात दिवस शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत.


अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका कायम आहे. आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसचे 20 बळी, तर 122 जणांवर अद्याप उपचार सुरू आहे. हा धोका वाढता पाहता अहमदनगरमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे या लॉक डाउन नंतर परिस्थिती नियंत्रणात येते का हे पाहणे आता औतुसक्याचे झाले आहे कारण राज्यातील बहुतांश भागात अनलॉक होत आहे.