भर चौकात साजरा केला वाढदिवस,हौस आली अंगलट, सरपंचासह ११ प्रतिष्ठीतांवर गुन्हा दाखल,जिल्ह्यातील घटना 

भर चौकात साजरा केला वाढदिवस,हौस आली अंगलट, सरपंचासह ११ प्रतिष्ठीतांवर गुन्हा दाखल,जिल्ह्यातील घटना 

अकलुज,टीम------
कोरोना महामारीमुळे आजही जिल्ह्यात अनेक निर्बंध घालण्या आलेअसून या मध्ये लग्न,वाढदिवस व इतर काही सार्वजनिक कार्यक्रमांचा समावेश आहे.परंतु तरीही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीरपणे लोकांची गर्दी करुन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा करण्याचा प्रताप संग्रामनगरचे विद्यमान सरपंच कमालभाई शेख यांनी केला असल्यामुळे अकलूज व संग्रामनगर मधील ११ प्रतिष्ठीतांवर  पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
   याबाबत अकलूज पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, येथील जुन्या बस स्थानक चौकामध्ये अमीर हाँटेलच्या समोर सार्वजनिक ठिकाणी काही इसम बेकायदेशीरपणे विनामास्क,कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करत असल्याची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे रफिकभाई पठाण व यासिन बागवान (व्यापारी) यांचा वाढदिवस धुमधडाक्यात भर चौकात सुरु होता. 
  अकलूज पोलीसांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या संग्रामनगर ग्रामपंचायत सरपंच कमालभाई शेख ,  भाजपा माळशिरस तालूका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष रशिदभाई मुलाणी,अल्पसंख्यांक सेलचे उपाअध्यक्ष जमिर चौधर,व्यापारी रियाजभाई शेख,भैया माढेकर, नजिम खान, सोमनाथ पवार, महेन्द् साठे, सुधाकर बनसोडे, हसन माढेकर,तनवीर पठाण,हमिद मुलाणी यांच्यावर मानवी जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयची कृती केली म्हणुन भा.द.वि. २६९,१८८,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब प्रमाणे सरकारतर्फे पो.क.अमोल बबन पवार यांनी फिर्याद दाखल केली असून या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.सदर ची कारवाई पोहेकाॅ.भोसले, शेख,मपोनी तांबोळी यांनी केली आहे. 
सरपंचांनीच मोडला कायदा--- 
कोरोना महामारीच्या काळात गावात आपत्ती व्यवस्थापन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून गावाला कोरोनामुक्त ठेवण्याची जबाबदारी सरपंचावर आहे.मात्र संग्रामनगरचे सरपंच कमालभाई शेख यांनी सर्व कोरोना नियम,कायदे धाब्यवर बसवुन सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करत बेजबाबदार पणाचा कळसा गाठला आहे.
रस्त्यावर भर चौकात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या सरपंचासह अनेक प्रतिष्ठितांनवर गुन्हा दाखल करुन कारवाई केल्याबद्दल पो.नि सुगावकर व अकलुज पोलीसांचे सर्व सामान्य नागरीकांकडून कौतुक होत आहे.मात्र
या कारवाई मुळे  राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.