महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ,नातेवाईकांकडून जादा पैशाची वसुली,कारवाईसाठी थेट तहसीलदारांनाच घेराव

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ,नातेवाईकांकडून जादा पैशाची वसुली,कारवाईसाठी थेट तहसीलदारांनाच  घेराव

अकलूज,टीम-----
कोरोना संक्रमित रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्याकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या  हाँस्पिटलवर कारवाई करावी या व इतर प्रश्नासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्यावतीने माळशिरसचे तहसिलदार अभिजित निंबाळकर यांना घेराव घालण्यात.

    सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून कोरोना संक्रमित गंभीर अथवा अतिगंभिर रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत, सर्वसामान्य मानसाला हा खर्च आवाख्या बाहेरचा आहे.ज्या खासगी रुग्णालयात महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे सुविधा आहे,अशा हाँस्पिटल मध्ये रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ होते शिवाय योजनेत बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाकडून अतिरिक्त पैसे वसुल केले जातात.याची दखल घेत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्यावतीने विकास धाईंजे व राज्य सचिव वैभव गिते यांनी कार्यकर्त्यासह अकलुज येथाल विश्रामगृहावर तहसिलदार अभिजित निंबाळकर यांना घेरावा घालुन प्रश्न मार्गी लावण्यासाठी धारेवर धरले.


   महात्मा जोतीराव फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये रुग्णास दाखल करून घेण्यास व उपचार देण्यास टाळाटाळ करीत आहेत.रुग्णांच्या नातेवाईकांकडे अतिरिक्त पैशाची मागणी करीत आहेत.योजनेतील रुग्णास दर्जाहीन जेवण दिले जाते तर काही हॉस्पिटलमध्ये जेवण दिले जात नाही.रुग्णांस येण्याजण्याचा प्रवास खर्चसुद्धा देत नाहीत.हा प्रकार थांबवण्यासाठी तहसीलदार यांनी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालये,तालुका आरोग्य अधिकारी,सर्व वैद्यकीय अधिकारी,व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात यावी व कडक सूचना निर्गमित करण्याची मागणी राज्य सचिव वैभव गिते यांनी केली.आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरसचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करून परवाने निलंबित करण्याची मागणी केली.

   याप्रसंगी तहसीलदार निंबाळकर यांनी लवकरच संबंधितांची बैठक लवकरच लावण्यात येईल असे सांगितले.यावेळी नायब तहसीलदार काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.शहा रिपाइंचे अध्यक्ष अभिजित वाघमारे, एन.डी.एम.जे संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे,नवनाथ भागवत,प्रणव भागवत,प्रबुद्ध युवराज गायकवाड,शिवाजी साळे आदी उपस्थित होते.