देवभुमी पंढरीत विकेंडबाबत सावळा गोंधळ, गोरगरीबांचे फोटोशेसन तर धनदांडग्यांना मात्र मोकळिक

देवभुमी पंढरीत विकेंडबाबत सावळा गोंधळ, गोरगरीबांचे फोटोशेसन तर धनदांडग्यांना मात्र मोकळिक
दुकाने उघडण्याबाबत मोठा संभ्रम

पंढरपूर,टीम---

देवभुमी पंढरीला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने चांगलाच तडाखा दिला.या लाटेत  कोरोनाने अनेकांना आपल्या विळख्यात घेतले.पोट निवडणुकिनंतर तर दिवसाला शेकडो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येवु लागले त्यामुळे बेड मिळवण्यासाठी अनेकांना मोठी धावपळ करावी लागली होती.परंतु गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या कमी होत असून सध्या दिवसाला एक आकडी रुग्ण सापडत आहेत.हळूहळू सर्व काही अनलॉक होत आहे.परंतु विकेंडचा नियम कायम असतांनाही पंढरीत या बाबत सावळागोंधळ असल्याचे दिसत आहे.कारण अनेक ठिकाणी  दुकाने सुरु आहेत तर काही ठिकाणी मात्र शटर आड दुकाने सूरू ठेवून गर्दी केली जात आहे.एकिकडे केवळ रस्त्यावर असणार्‍यांचेचे फोटो काढून त्यांना विकेंडबाबत धमकावले जात आहे तर दुसरीकडे शटर आडून गिर्‍हाईक करणार्‍यां धनदांडग्यांकडे दुलर्क्ष केले जात आहे.


जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्येत पंढरपूर सतत आघाडीवर राहत होते.परंतु प्रशासकिय यंत्रणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन कोरोनावर विजय मिळवत वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवेले त्यामुळेच आज सर्वत्र बेड शिल्लक राहत असून सर्वांनाच मोठा दिलासा मिळालेला आहे.आता सर्वकाही अनलॉक होत आहे.

सोमवार पासून कदाचित सोलापुूर शहर व ग्रामीण भागातील दुकांनांची वेळ वाढून  दिलासा मिळणार आहेे.परंतु पुण्यामध्ये शनिवार रविवारचा लॉकडाऊन कायम ठेवला असल्यामुळे सोलापुर मध्येही हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.परंतु तुर्तास तरी सध्या विकेंडला लॉकडावून आहे.पण याबाबत पंढरीत सर्वांमध्येच मोठा संभ्रम असल्याचे दिसून आले.कदाचित पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असेल,नविन काही तरी आदेश झाला असेल,माहीती घेवून सांगतो अशी विविध उत्तरे कानावर पडली.तर दुसरीकडे,आम्ही दुकाने उघडल्यावर आमचे फोटो  काढले आहेत मात्र काही दुकाने शटर आडून खुलेआम सुरु आहेत. त्यांच्याकडे कधी कोणी जात नाही,आम्ही रस्त्यावर बसून पोटाची खळगी भरतो हीच आमची चुक आहे अशी संतंप्त प्रतिक्रीया ऐकावयास मिळाली.

यामुळे पंढरीत नक्किच विकेंड लॉकडावून आहे का? असल्यास काय सुरु राहणार व काय बंद राहणार हे स्पष्ट करावे .कारण अत्यावश्यक सेवच्या नावाखाली अनेकांनी गैरफायदा घेतला असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे निवांत झालेल्या प्रशासकिय यंत्रणेने अर्लट राहणे गरजेचे आहे अन्यथा तिसरी लाट पंढरपूुरकरांच्या दारात कधी येवून बसले याचा थांगपत्ता कुणालाही लागणार नाही.कारण त्यानंतर मात्र पळापळ होईल हे मात्र निश्‍चित आहे.