मतदारसंघाला कोरोनामुक्त करण्यासाठी आ.समाधान आवताडे लागले कामाला, जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक,ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट

मतदारसंघाला कोरोनामुक्त करण्यासाठी आ.समाधान आवताडे लागले कामाला, जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक,ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट

पंढरपूर,टीम-----

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे हे निवडून आले.वास्तविक पाहता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाचा या मतदारसंघात कमळ फुलले असून हा विजय राज्याच्या राजकारणाला व महाविकास आघाडीच्या सत्तेला कलाटणी देणारा आहे.परंतु तरीही विजयाचा  फारसा जल्लोष साजरा न करता आ. समाधान आवताडे विजयाच्या दुसऱ्या दिवशी लगेच मतदारसंघाला कोरोनामुक्त करण्यासाठी आ. समाधान आवताडे हे मैदानात उतरले असून त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे आ. प्रशांत परिचारक यांच्या समवेत सर्व अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचे गांभीर्य पाहता पंढरपूर - मंगळवेढा मधील डाॅक्टर मंडळींसोबत  ऑक्सिजन संदर्भात झालेल्या चर्चेनुसार विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी दि.4 एप्रिल रोजी टेंभुर्णी  येथील एस.एस. बॅग्स ऑण्ड फिलर्स प्रा.लि. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास तात्काळ प्रत्यक्ष भेट दिली. येथील ऑक्सिजन निर्मिती स्वरूप अनुषंगाने येणाऱ्या अडी - अडचणी आ. आवताडे यांनी जाणून घेतल्या व त्यावर या प्रकल्पाचे चालक प्रभाकर शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सद्या काळात 24 तास प्लॅट चालूनही ऑक्सिजन पुरवठ्याची खूप मोठी टंचाई असल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होत आहे.  

कमी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ. समाधान आवताडे यांनी या भेटीदरम्यान FDI अधिकारी व जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून या प्रकल्पा संबधित माहिती व अडचणीची माहिती दिली.

 दि.5 एप्रिल  रोजी बैठक होणार असून यात पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघात निर्माण झालेल्या कोरोना स्थिती अनुषंगाने त्यांनी येथील ऑक्सिजन तुटवडा, रेमडिसिवर इंजेक्शन तसेच वॅक्सशीन या बाबत जिल्हाधिकारी यांचे सोबत  चर्चा होणार असून  संपूर्ण मतदारसंघाला कोरोनामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आ.समाधान आवडते यांनी सांगितले आहे.