विनापरवाना कोरोना टेस्ट करणाऱ्या डॉक्टर सह लॅब चालकावर गुन्हा,जेऊर मधील धक्कादायक प्रकार

विनापरवाना कोरोना टेस्ट करणाऱ्या डॉक्टर सह लॅब चालकावर गुन्हा,जेऊर मधील धक्कादायक प्रकार

करमाळा,टीम----

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.सर्वच   तालुक्‍ यांना कोरोनाने मोठा विळखा घातला आहे.अनेकांना बेड व इंजेक्शन  साठी वणवण करावी लागत आहे.परंतु अश्या  परिस्थितीत ही काही मंडळींकडून मोठा गैरफायदा घेत मालामाल होण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 करमाळा येथील जेऊर मध्ये विनापरवाना कोरोना रुग्णांची टेस्ट करून देण्याचे  प्रकार उघडकीस आला असून एक डॉक्टर व लॅब टेक्निशियन वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल अहिरे यांना  जेऊर मध्ये डॉ. पांढरे व लॅब टेक्निशियन भोसले हे विनापरवाना कोरोना रुग्णांची टेस्ट करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्याप्रमाणे पोलिसांनी डमी पेशंट म्हणून रोशे वाडी  येथील एका कृष्णाई हॉस्पिटल मध्ये पाठवले.तेव्हा डमी  रुग्णाची अँटिजेंन टेस्ट करण्याबाबत  डॉ. हेमंत पांढरे यांनी भोसले यांच्या नावाने संबंधिताची टेस्ट करण्यासाठी सांगितले तेव्हा लॅब चालकाकडे वापरलेल किट व न वापरलेले   किट सापडले याबाबत लेखी अहवाल तालुका वैद्यकीय अधिकारी सागर गायकवाड यांनी दिल्यानंतर त्यांनी जेऊर येथील कृष्णाई हॉस्पिटल मधील डॉक्टर व लॅब चालकावर कोविड  ची टेस्ट करण्याची परवानगी नसल्याने सरकारतर्फे तक्रार दिली त्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल हिरे   यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. जाधव, पोलीस कॉन्स्टेबल खैरे, पोलीस नाईक शेख, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, यांच्या पथकाने पार पडली.
 या कारवाईमुळे जेऊर,करमाळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून अजून अशा किती लॅब व बोगस डॉक्टर आहेत याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले  जात आहे.