देवभूमी पंढरीत  दुकाने बंद करतानाही वशिलेबाजी,गोरगरिबांवर अरेरावी तर बड्या धेंड्यांना मात्र सवलत

देवभूमी पंढरीत  दुकाने बंद करतानाही वशिलेबाजी,गोरगरिबांवर अरेरावी तर बड्या धेंड्यांना मात्र सवलत

पोलीस प्रशासन दक्ष इतर विभाग मात्र सुस्त 

पंढरपूर,टीम----

 राज्यसरकारने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी देवभूमी पंढरीत सकाळी 11 वाजेनंतर प्रशासन रस्त्यावर येऊन वातावरण टाईट करत आहे. मात्र यातही अनेक ठिकाणी वशिलेबाजी व तोंड पाहून कारवाई होत असून एकीकडे गोरगरिबांवर अरेरावी तर दुसरीकडे मात्र काही जणांना दुकाने बंद करण्यासाठी सवलत व मुभा दिली जात असल्याचा प्रकार गुरुवारी गाडगे महाराज मठाच्या आसपास पहावयास मिळाला. यामुळे अश्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक व गरजेच्या वस्तूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली असून 11 नंतर सर्वत्र कडक शटर डाउन पाळले जात आहे. जी दुकाने 11 नंतरही सुरू आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र यातही देवाच्या नगरीत वशिलेबाजी  होत आहे. गुरुवारी 11 वाजेनंतर नगरपरिषदेची अतिक्रमण पथकाची गाडी छत्रपती शिवाजी चौकातून पुढे स्टेशन रोड वरील गाडगे महाराज मठ परिसरात आली पण तेथे मात्र वेगळाच प्रकार दिसून आला.रस्त्यावर बसून जे फळ विक्रेते फळे विकत होते त्यांच्या सोबत अरेरावी तर त्यांचा माल ही उजळण्याचं काम काही जण करीत होते,मात्र दुसरीकडे एका बँकेच्या समोर जे मोठ्या छत्र्या लावून मोठा पसारा व फुगटची जागा पकडून फळे विकत आहेत त्यांना मात्र काहीही बोलले जात नव्हते,जेव्हा पोलिसांनी तेथे एन्ट्री झाली तेव्हा नपा च्या अतिक्रमण पथकाचे त्या बड्या फळ विक्रेत्यांकडे लक्ष गेले ,मग काय नेहमीप्रमाणे थातुरमातुर कारवाई चा देखावा या पथकाने उभा केला. कारण याच वेळी दत्त लॉज समोरील  काही बेकरीवाले व खाद्य पदार्थ दुकानदार  एक शटर अर्धवट सुरू ठेऊन माल विकत होते.त्यामुळे  हा सर्व प्रकार पाहून अश्यातही वशिलेबाजी यांना कशी जमते अशी चर्चा नागरिकांमधून केली जात होती व सदर पथकाबाबत ही अनेक उलट सुलट चर्चा केली गेली.

सरकारकडून एकीकडे गर्दी करू नका,एकमेकांत अंतर ठेवा अश्या सुचना नागरिकांना दिल्या जात आहेत मात्र दुसरीकडे नपाच्या अतिक्रमण पथकाच्या गाडीच्या फाळक्यात  मात्र अनेक जण एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून,विना मास्क  बसलेले दिसत असतात. त्यामुळे सोशल डिस्टन्स चा नियम यांना नाही का असा ही सवाल उपस्थित होत आहे.
पंढरीत दररोज कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत जात आहे.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य माणसाला जीवन कसे जगायचे याचे कोडे पडत आहे.त्यामुळे दुकाने बंद करतांना जर अशीच वशिलेबाजी होत राहिली तर मात्र रस्त्यावर बसून पोटाची खळगी भरण्यासाठी राबणारे हात मात्र नक्कीच कायदा हाती घेऊन मोठा उद्रेक करतील हे चित्र या  पथकाच्या अश्या वागण्यावरून स्पष्ट पणे दिसत आहे.