पंढरपूर तालुक्यात लागला सरपंच निवडीचा मुहूर्त,४७ अध्यासी अधिकारी नियुक्त

पंढरपूर तालुक्यात लागला सरपंच निवडीचा मुहूर्त,४७ अध्यासी अधिकारी नियुक्त

पंढरपूर तालुक्यात लागला सरपंच निवडीचा मुहूर्त,४७ अध्यासी अधिकारी नियुक्त

पंढरपूर टीम-

पंढरपूर तालुक्यात मोठ्या चुरशीने  ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यंदाच्या निवडणुकांमध्ये तरुणाईने मोठा सहभाग घेतल्याचे पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी गाव कारभारी म्हणून तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे.

तालुक्यात पहिल्या टप्प्यात ९४ पैकी ७२ 

 गावांमध्ये ग्रामपंजायत निवडणूक पार पडला या मध्ये जैन वाडी  येथे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. या  सर्व ग्रामपंचायतीमध्ये सरपंच,उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

मंगळवार दि.९ फेब्रुवारी -

तालुक्यातील तिसंगी,सोनके,उंबरगाव,तनाळी, शिरगाव खर्डी, तावशी,अनवली कासेगाव, पोहरगाव, शंकरनळी, फुुलचिंचोली, जैनवाडी, मगरवाडी, शेगावदुमाला,नारायण चिंचोली, बाभूळगाव, आव्हेतरtगाव,करकम्ब,उंबरेे,पेहे, भाळवणी,केेस्करवारी,शेंडगेवाडी,उपरी,सुपली, पिरचिकूरोली, पळशी वाडीकुरोली,देवडे, शेवते,चिलाईवाडी,भोसे,सुगावभोसे ,ओझेवाडी ,नेपतगाव,  गोपाळपूर,चळे, कोंढारकी, मुंडेवाडी ,गादेगाव, शेळवे, वाखरी,शिरढोन,चिंचोली भोसे, कौठली, खेडभाळवणी, या गावातील सरपंच पदाची निवड मंगळवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

गुरुवार दि.११फेब्रुवारी

 बोंहाळी ,तपकिरी शेटफळ,सिद्धेवाडी चिचुंबे तरडगाव, एक्लास्पुर ,खरसोळी, विटे,आंबे चिंचोली ,तारापूर,भटुंबरे, देगाव,आढिव, नांदोरे ,करोळे, सांगवि बादलकोट, धोंडेवाडी ,उजनी वसाहत, पटवर्धन कुरोली, रांजणी सरकोली, बंडीशेगाव येथील सरपंच निवड दिनांक ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे

शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी--

सुस्ते,रोपळे, कान्हापुरी,आंबे, अजन्सोंड, या गावांमध्ये सरपंच,उपसरपंच  निवड घेण्यात येणार आहे.

याकरिता अध्यासी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत सरपंज निवडणूक घेण्यात यावी असे बंधनकारक आहे.त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी सर्व गावांसाठी स्वतंत्र अध्यासी अधिकारी नेमून विशेष सभेचे आयोजन करत सरपंच,उपसरपंच निवड घ्यावी याबाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व  तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार दिनांक ९, ११ व १३  फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे.