आंदोलन करतांना दिशा हुकली ,अडवला रस्ता,घेतला मयत प्रेताचा सहारा, झाली अहवेलना,चिथावणी आली अंगलट, दाखल झाला गुन्हा
पंढरपूर,टीम------
तालुक्यातील आढीव विसावा (विठ्ठल वाडी) येथे स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रंलबीत आहे. स्थानिक नेते मंडाळींच्या दबावाला बळी पडून प्रशासन चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ गुरुवार दि.22 जुलै रोजी सकाळी तेथे एक मयत महिलेचे पंढरपूर-कुर्डवाडी रस्त्यावर प्रेत ठेवुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, परंतु हे आंदोलन आता आंदोलांकर्त्यांच्या चांगलेच अंगलट आले असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण आंदोलन करणाऱ्या तब्बल सतरा जणांसह इतर आठ ते दहा पुरुष व महिलांवर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठलवाडी विसावा येथे जवळपास 600 ते 700 लोकसंख्या असून विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले आहे. मात्र या पुनर्वसित लोकांसाठी स्मशानभूमीची कोणतीही सुविधा नाही. वारंवार मागणी करूनही येथे स्मशानभूमी उपलब्ध होत नसल्यामुळे स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे व त्यातूनच हे आंदोलन झाले होते. परंतु सदरच्या आंदोलनाप्रसंगी प्रेताची अवहेलना करून प्रेत रस्त्यावर घेऊन बसत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे, स्मशानभुमी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अरे कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही, अशा घोषणा दिल्या गेल्या.चर्चेतून मार्ग काढू ,प्रेताचे अंत्यसंस्कार होऊ द्या असे या प्रसंगी प्रशासनाकडून सांगितले गेले मात्र तरीही आंदोलन करते आंदोलनावर ठाम राहिले.
याप्रसंगी अजयसिंह लक्ष्मण खांडेकर यांनी मी भटुंबरे गावचे उपसरपंच असून विसावा हे भटुंबरे ग्रामपंचायत मध्ये येत आहे. सदर ठिकाणचा स्मशानभूमीचा प्रश्न 40 वर्षांपासून प्रलंबित असून शासन जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहे असे सांगून प्रक्षोभक विधाने करून प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. परंतु अजयसिंह खांडेकर हे भटुंबरे गावचे उपसरपंच असून त्यांचे भावाची पत्नी उपसरपंच आहे. तरीही त्यांनी मीच उपसरपंच आहे अशी बतावणी करून पत्रकारांना मुलाखत देत दिशाभूल केली व रास्ता रोको करून कोरोना रोगाच्या साथीचा फैलाव होऊ नये केंद्र शासनाने तसेच महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्या आदेशाचे उल्लंघन केले.तसेच स्मशानभूमीचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. आपण सदरचे प्रेत भटुंबरे येथे न नेता रस्त्यावर ठेवून रास्तारोको करू, प्रशासनाला आपल्या स्मशानभूमीचे मागणीकडे लक्ष देण्यास भाग पाडू अशी चिथावणी मयताच्या नातेवाईकांना देऊन या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले व प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे जमाव जमून मयत व्यक्तीचे प्रेत पंढरपूर ते कुर्डवाडी राष्ट्रीय महामार्गावर आणून सर्वसामान्य नागरिकांना पुढे जायचे नाही अशी दमदाटी करून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केला त्याचप्रमाणे कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून अजय उर्फ नाना लक्ष्मण खांडेकर रा. भटुंबरे यांचेसह सर्व आंदोलनकर्त्यांवर भादवि कलम 341,143, 145, 149, 109, 188, 269, 270 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135,आपत्ती व्यवस्थापन अधी 2005 चे कलम 51(ब), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2 व 3 प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोना गजानन माळी यांनी दि. 22 जुलै रोजी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.कारण गेल्या अनेक वर्षांपासून होत नसलेल्या समशानभूमी साठी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले मात्र आंदोलन करतांना त्यांची दिशा चुकली. कारण मयत एका वयस्कर महिलेच्या प्रेताची अवहेलना झाली. प्रशासनाला कोणतीही सूचना सूचना न देता रास्ता रोको झाला. त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारत पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.