पतींच्या नावाचा सारखेपणा महिला उमेदवारांसाठी ठरतोय डोकेदुखी
पतीच्या नावाचा साम्यपणा पत्नींला ठरतोय डोकेदुखी!
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
संपूर्ण राज्यात सध्या ग्रामपंजायत निवडणूकांचे वातावरण चांगलेच गरम झाले असून गावा-गावात राजकीय पक्षांनी प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडवला आहे. प्रचारासाठी वेगवेगळे प्रयोग व फंडे वापरले जात आहेत मात्र महिलांची एक जोडी सोशल मीडियावर चांगलीच फेमस झाली आहे .
सुजाता कल्पेश म्हस्के आणि कोमल कल्पेश मस्के या पिंपळास ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वार्ड क्रमांक 4 ड मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, या दोघींच्या पतींच्या नावाचा साम्यपणा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. कल्पेश बारक्या म्हस्के आणि कल्पेश सुरेश म्हस्के हे दोघे नातेवाईक असून कल्पेश बारक्या म्हस्के यांचा कल्पेश सुरेश म्हस्के हा चुलत भावाचा मुलगा लागतो. कल्पेश बारक्या म्हस्के यांचे 2016 साली सुजाताशी लग्न झालं तर कल्पेश सुरेश म्हस्के यांचा 2017 साली कोमलशी विवाह झाला. आता कोमल व सुजाता या दोघीही ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकाच वार्डातून शिवसेना पुरस्कृत अग्निमाता ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आहेत. मात्र, याच नावाचा साम्यपणा मतदारांसह त्यांनाही गोंधळात पाडतोय. आता याचा परिणाम निवडणुकीत काय गोंधळ घालतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल.