शेतकरी,सभासदांना सुखद धक्का देणाऱ्या चेअरमन अभिजीत पाटलांनी पत्रकारांना दिला दिलखुलास धक्का,जिंकली सर्वांची मने
निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारिता ही आजच्या काळाची व समाजाची मुख्य गरज-अभिजीत पाटील.
पत्रकार दिन विशेष “एक अक्षर संवाद” मुलाखत गाजली
पंढरपूर,टीम----
विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील पंढरपूर शहर व ग्रामीण भागात सत्यात्याने नावीन्य पूर्ण उपक्रम राबवून सर्वांना आपलेसे करत आहेत,त्यामुळे जनमाणसांचा एक मोठा गोतावळा अभिजीत पाटलांच्या अवतीभोवती जमा होत आहे."आपला माणूस" म्हणून एक आगळी वेगळी ओळख आता अभिजीत पाटील यांची झाली असून त्यांनी पंढरपूर शहर,ग्रामीण व मंगळवेढा तालुक्यातील पत्रकारांना एक अनोखा सुखद धक्का देत आपल्या दिलखुलास वृत्तीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांची मुलाखत “एक अक्षर संवाद” हा एक आगळावेगळा उपक्रम सायंकाळी मोठ्या आनंदात dvp स्क्वेअर येथे संपन्न झाला.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील दर वर्षी पत्रकार बांधवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. पण तो कार्यक्रम कायम अनौपचारिक स्वरूपाचा असतो. या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे एक अभिनव प्रयोग होता. एका राजकीय क्षेत्रातील कार्यरत व्यक्तीने पत्रकारांची मुलाखत घेणे हे अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक ठरले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांच्यासह प्रशांत आराध्ये, अभय जोशी,राजाभाऊ शहापूरकर,महेश खिस्ते,सिद्धार्थ ढवळे सर,प्रशांत मोरे आदी मान्यवर पत्रकार बांधवांनी अत्यंत मार्मिक शब्दात प्रामाणिकपणे पत्रकारिता दशा, दिशा आणि अपेक्षित याबाबत संवाद साधला.आपल्या तत्वांच्या बाबत विचार मांडतानाच राजकीय क्षेत्र व प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्याकडून असलेल्या संवेदनशिलतेच्या अपेक्षा व्यक्त केल्या. पंढरपूरच्या विकासाबाबत सद्य परिस्थिती आणि विकासाबाबत अपेक्षा विस्तृत स्वरुपात मांडल्या.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधवाना ओळखले जाते,समाजाचा आरसा म्हणून पत्रकार बांधव समाजात वावरत असतात. दि.६ जानेवारी रोजी पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सालाबादप्रमाणे यंदाही दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा केला.हा आगळावेगळा पत्रकार दिन साजरा करताना दैनंदिन जीवनात पत्रकार बांधव नेहमी राजकीय, सामाजिक कार्यात सर्वांच्या पुढे असतात परंतू त्यांची मते कधीच समाजापुढं मांडण्याचा योग आला नाही म्हणून मुलाखत घेतली असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.एक अक्षर संवाद या उपक्रमा दरम्यान ज्येष्ठ पत्रकारांनी अभिजीत पाटील यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना दिलखुलास पणे उत्तरे दिल्यामुळे ही अनोखी गप्पांची मैफील चांगलीच रंगली होती या प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात करून मोठा प्रतिसाद दिला.
एकंदरीत हा पत्रकार दिन हा एका वैचारिक मंथनाचे माध्यम ठरला. राजकारण्यांना काय वाटते यापेक्षा पत्रकारांना काय वाटते हे जाणून घेतल्यास जनतेच्या मनातील आवाजाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यासारखे होते. या कार्यक्रमास असंख्य पत्रकारांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमानंतर सर्व पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आपल्या अभिनव संकल्पनांसाठी प्रसिद्ध असलेले चेअरमन अभिजीत पाटील यांनी आणखीन एक अभिनव उपक्रम यशस्वी करून दाखवला अशी चर्चा रंगली होती.