पंढरीत शिवजयंती निमित्त शिवभक्तांसाठी अनोखी बौद्धिक मेजवानी,विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवस व्याख्यानमाला
शिवजयंतीनिमित्त ३ दिवसीय व्याख्यानमालेचे पंढरपूर येथे आयोजन- अभिजीत आबा पाटील
पंढरपूर,टीम ------
दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या दि.१६ फेब्रुवारी रोजी व्याख्याते शिवश्री डॉ.शिवरत्न शेटे व दि.१७ फेब्रुवारी शिवश्री यशवंत गोसावी आणि दि.१८ फेब्रुवारी रोजी शिवश्री श्रीमंत कोकाटे सर यांचे व्याख्यान होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलाचा उलगडता इतिहास तळागाळापर्यंत पोहचावा याकरिता या तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर शिवतीर्थ येथे दि.१६ ते १८ फेब्रुवारीपासून सायंकाळी ७ ते ९ या वेळेत व्याख्यानमालेस जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले आहे.