वाहतूक पोलीस कारवाईच्या रडारवर,खाजगी मोबाईलचा वापर केल्यास होणार कारवाई,वाहनचालकांना मोठा दिलासा?

वाहतूक पोलीस कारवाईच्या रडारवर,खाजगी मोबाईलचा वापर केल्यास होणार कारवाई,वाहनचालकांना मोठा दिलासा?

मुंबई,टीम ----


रस्त्यावर नेहमीचा वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करतांना दिसत असतात यामुळे अनेकदा नियमात वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असतो पण आता राज्यातील सर्व वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

 वाहतुकीच्या नियमांचा भंग झाल्यास तुमच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच आता वाहतूक पोलीस प्रोटोकॉलचा भंग केल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.


राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगाल यांनी या संबंधित परिपत्रक जारी केलं असून वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी खासगी वाहन वा त्यांच्या खासगी मोबाईल न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असं न झाल्यास वाहतूक पोलिसांनाच दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

  या परिपत्रकात वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करू नये. जर कोणी खाजगी मोबाईलचा वापर केला तर कारवाई होणार.

काही अधिकारी आणि अंमलदार ई-चलान मशिनद्वारे कारवाई न करता आपल्या खासगी मोबाइलवर फोटो काढतात अशा स्वरुपाच्याही काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फक्त चलान मशिनद्वारेच फोटो काढणे अपेक्षित आहे. असं न झाल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून काही कालावधी नंतर ई चलान मशिनमध्ये फोटो अपलोड करतात. तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे गाड़ी कोणची आहे ओळखणे अशक्य होते.

पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकडील ई चलान मशिनबाबत काही समस्या, अडचणी असल्यास तशी तक्रार द्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.यामुळे वाहतूक पोलीस व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आता मोठे पाऊल उचलण्यात येत असल्यामुळे याचा सहाशिकच मोठा फायदा सर्वसामान्य वाहनधारकांना होईल.