आ.समाधान आवताडेंची दमदार कामगिरी,४ गावांना मिळणार २८ कोटी,पिण्याचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

आ.समाधान आवताडेंची दमदार कामगिरी,४ गावांना मिळणार २८ कोटी,पिण्याचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

मंगळवेढा,टीम ------

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत समाविष्ठ असलेल्या दामाजी नगर ,चोखामेळा नगर,आंधळगाव व लक्ष्मी दहिवडी या गावात हर घर जल से नल अंतर्गत जल जीवन मिशन मधून  पाणी पुरवठा योजनेसाठी २८ कोटी ९८ लाख इतका निधी मंजूर झाला असल्याची  माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.    

  सदर निधी मंजूर झालेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना अधिक स्वरूपात सुलभ आणि विस्तारित करण्याच्या अनुषंगाने हा निधी मार्गी लागणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या माध्यमातून गावामध्ये पाणीटाकी उभी करणे, पाण्याचे व्यवस्थापन  होण्यासाठी घरोघरी पाणीनळ बांधणे आदी पाणीपुरवठा साधने विकसित करण्यासाठी हा निधी वापरता येणार आहे. आमदार पदावर विराजमान झाल्यापासून  आरोग्य, रस्ते व पाणी या बाबींवर विशेष लक्ष असून विविध मार्गांनी शासनदरबारी असणारा निधी मतदारसंघामध्ये खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना अत्यंत चांगली आहे. 
गेली अनेक वर्षे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणारा मंगळवेढा सुजलाम सुफलाम करणे हा माझा मानस आहे राज्यात सत्ता बदल झाल्यापासून शासनाच्या निरनिराळ्या खात्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मिळवत असून मतदारसंघात निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.ग्रामस्थांमधून आ.आवताडे यांचे अभिनंदन केले जात आहे.