दुष्काळात जन्मलेल्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही,आ.समाधान आवताडे यांनी दिला शब्द,24 गावांसाठी मिळणार 578 कोटी,50 वर्षापासून रखडलेले काम होणार अडीच वर्षात पूर्ण

दुष्काळात जन्मलेल्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही,आ.समाधान आवताडे यांनी दिला शब्द,24 गावांसाठी मिळणार 578 कोटी,50 वर्षापासून रखडलेले काम होणार अडीच वर्षात पूर्ण


आ.समाधान आवताडे यांची मंगळवेढ्यात भव्य मिरवणूक व नागरी सत्कार संपन्न

मंगळवेढा,प्रतिनिधी -------


पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडून आल्यावर मला जेवढा आनंद झाला नव्हता,तेवढा आनंद अधिवेशनात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीला होकार मिळाल्यावर मला झाला होता. या उपसा सिंचन योजनेला 578 कोटी रुपयांची गरज असून निधी उपलब्ध करून योजना मार्गी लावण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून लवकरच निधी मिळवून या तालुक्यातील दुष्काळात जन्मलेल्या माझ्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही असा शब्द आ.समाधान आवताडे यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना दिला आहे.


 तालुक्यातील 24 गावचा पाणी प्रश्न अधिवेशनात मांडून उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचेकडून अधिवेशनानंतर 7 दिवसाच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरी घेऊन त्यानंतर सात दिवसात कॅबिनेट लावून विशेष बाब म्हणून मंजूर करून घेऊ असा शब्द आ. आवताडे ड   यांना विधानसभा अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेकडून मोठा जल्लोष केला गेला.

अधिवेशन संपल्यानंतर आ.समाधान आवताडे हे पहिल्यांदाच मतदारसंघात आल्यानंतर 24 गावातील शेतकरी व मतदार संघातील कार्यकर्त्यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

या प्रसंगी बोलताना आ.समाधान आवताडे म्हणाले की, 
50 वर्षात रखडलेली काम मी अडीच वर्षात पूर्ण करणार असून मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्यामुळे पौट साठवण तलाव,भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,बसवेश्वर स्मारक,गुंजेगाव पुलाचा प्रश्न,एमआयडीसी चा प्रश्न,ग्रामीण रुग्णालय,रस्त्यांचे प्रश्न,असे सर्व प्रलंबित प्रश्न लवकरच  मार्गी लागतील त्यासाठी  सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले.या सत्कार समारंभ प्रसंगी  कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर मध्येही आ.समाधान आवताडे यांचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

आ.आवताडे यांनी 24 गावांसाठी केलेल्या या कार्यामुळे या गावांचा दुष्काळ कायमचा संपणार असून यामुळे मंगळवेढा तालुक्याच्या सर्वांगीण उन्नतीला ही मोठा हातभार लागणार आहे.