अकलूज टीम-
वयाच्या सहाव्या वर्षीच मोठा होवुन भारत मातेची सेवा करणार .त्यासाठी सैन्य दलात जाणारच ही जिद्द मनात ठेवुन हर्षल हरिश्चंद्र पाटील ग्रीन फिंगर्स स्कूल अकलुज मधील इयत्ता चौथी मधील या नऊ वर्षांच्या धाडशी आणि जिद्दी बालकाने गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील अवघड २३ गड किल्ले सर करीत त्याच्यात दडलेल्या छोट्या मावळ्याचे व भारतमातेच्या जिद्दी सुपुत्राचे दर्शन सामाजास घडविले.
अकलुज येथील पोलीस कर्मचारी हरीश्चंद्र पाटील यांचा नऊ वर्षे वयाचा हर्षल हा मुलगाआहे .वडिल पोलीस कर्मचारी असल्याने त्याला आपोआपच व्यायामाची आवड लागली. रोज धावणे,सायकलिंग करुन ऊंच भरारीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्याने लहान वयातच आपले मन व शरीरयष्टी मजबुत बनविण्याची जोरदार तयारी सुरु केली. वर्ष भराच्या कठोर मेहनतीने पायात थोडे बळ आले नि त्या बळाला गुड मॉर्निंग ग्रुपची साथ मिळाली. त्त्या माध्यमातुन छत्रपती शिवराय,त्यांचे मावळे ,स्वराज्यआणि स्वराज्यातील प्रत्येकाला प्राणापेक्षाही प्रिय अशा गड-किल्यांचा इतिहास त्या कानावर पडु लागला.शिवराय आणि त्यांचे मावळे ज्या गड-किल्यांसाठी आपले प्राण हातावर घेवुन फिरत होते ते गड-किल्ले कसे असतील हा प्रश्न त्याच्या बालसुलभ मनाला स्वस्थ बसु देत नव्हता. यामुळे महिना-दोन महिन्यातुन एकदा हर्षल वडिलांसोबत "गुड मॉर्निंग"ग्रुप मध्ये मिसळायचा.हर्षल सहा वर्षांचा झाला.बालवयातील प्रचंड ऊत्सुकतेच्या जोडीला ग्रुप मधील हौशी सहकारी यांचेमुळे निसर्ग आणि शिवरायांचे गड-किल्ले यांची भुरळ हर्षलला पडली. आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रमी इतिहास हर्षलच्या बालमनाला स्फुरण देत होता.येथुनच सुरु झाला छोट्या हर्षलचा मोठ्यांनाही आचंबीत करणारा खडतर प्रवास.
हर्षलची जिज्ञासा,जिद्द आणि चिकाटी ग्रुप मधील डॉ.शिरीष रननवरे,डॉ.सुनिल राऊत,समाधान देशमुख ,वैभव आंबेकर यांच्या अनुभवी नजरेतुन सुटली नाही.त्यांनी हर्षलला प्रत्येक वेळी सोबत घेवुन जावु लागले नि वयाच्या पाचव्या वर्षी क्रिडा संकुल वरील ते छोटे पाऊल सहाव्या वर्षी गड सर करण्यासाठी धडपड करु लागले.वडिलांचे पाठबळ,जेष्ठांचे आशिर्वाद आणि ग्रुपमधील सहकार्यांच्या अतुट साथ रुपी दोरखंडाच्या आधाराने हर्षलने गडाच्या पायथ्याशी पहिले पाऊल ठेवले पण त्याची नजर गडाच्या शिखरावर स्थिरावली होती....
वय अवघे सहा वर्षे असले तरी त्याची जिद्द ही विशीतील तरुणाला लाजवेल अशीच होती.त्याची किल्ल्याच्या शिखरावर स्थिरावलेली नजर पायात कमालीची ताकद देत होती, त्याच्या स्वप्नांना मुर्त रुप देण्यासाठी ,ऊंच भरारी घेण्यासाठी पंखात बळ देत होती.मनात जिद्द तर होतीच पण ऊंच स्थिरावलेली नजर त्या जिद्दीला द्विगुणीत करत होती.त्याच्याच जोरावर हर्षलने पहिल्यांदा *जरांडेश्वर*गड वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी सर करीत आयुष्यातील आपल्या जिद्दीच्या जोरावर ऊंच ऊडु पाहणार्या स्वप्नांना मोकळ्या आवकाशात मुक्त भरारी घेण्याची ताकद दिली.त्यानंतर त्याने सज्जनगड ,कासोटा असे एकामागुन एक आवघड २३ गड-किल्ले सर करीत महाराजांना मानाचा मुजरा केला.
सध्या हर्षल नऊ वर्षांचा आहे.त्याचे वजन३२ किलो तर ऊंची १४७ सें,मी.आहे. या बालकाने राजगड,नवजा,प्रतापगड,रायगड ,जंजीरा,तुंग,लोहगड,कमळगड,केंजळगड,हरीश्चंद्र गड,हरीहर गड,अलीबाग,रायटी,शिवनेरी,जीवधन,नाणेघाट,विसापुर असे महाराजांचे विविध २३ गड-किल्ले सर केलेत. मी मोठा होवुन भारतमातेची सेवा करणार आहे.त्यासाठी मी सैन्य दलात जावुन माझी मातृभुमी आणि देशवासीय बंधु भगिणी,मातांचे रक्षणासाठी अहोरात्र कष्ट करुन जन्मभुमीच्या ऊपकारातुन ऊतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय आपल्या छोट्या वयात या
बालकाने व्यक्त केला आहे न त्यामूळे या छोट्या मावळ्याची जिद्दी, नजर ,ऊंच आकाशातील चमकणार्या तार्याचा वेध घेत होती.अशा या जिद्दी ,धाडशी मावळ्याला भविष्यात ऊंच गरुड भरारी घेवुन आकाशातील तार्या प्रमाणे चमकण्यासाठी सर्व शिवभक्त मधूून शुभेच्छा दिल्या जात असून या चिमुकल्या हर्षल चे मोठे कौतुक व अभिनंदन होत आहे.