पुन्हा सुरू होणार किलबिलाट,सापडला मुहूर्त,राज्यात या तारखेपासून वाजणार पहिली ते 10 पर्यंतच्या शाळांची घंटा

पुन्हा सुरू होणार किलबिलाट,सापडला मुहूर्त,राज्यात या तारखेपासून  वाजणार पहिली ते 10 पर्यंतच्या  शाळांची घंटा

मुंबई,टीम----

 कोरोनामुळे राज्यात अजूनही प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या नव्हत्या. आता प्राथमिक शाळासंदर्भात सर्वात मोठी बातमी पुढे आली असून राज्यात 1 डिसेंबरपासून पुन्हा शाळा सुरू होणार असून. आता पुन्हा नव्या जोमाने शाळेची घंटा वाजणार आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली ते 10 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. 

राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. टास्कफोर्सने शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर प्रशासन आणि टास्क फोर्सने मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.


 राज्यात 8 ते 12 वीच्या शाळा सुरू आहेत. मात्र आता 1ली ते 10 वीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.शाळा सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण संख्या कमी आहे,त्या भागात शाळा सुरू झाले आहेत मात्र ज्या भागात कोरोना  आहे तेथे शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात सर्रासपणे अनेक भागात शाळा सुरू झाल्या आहेत मात्र अनेक शहरे व शहरातील शाळा याला अपवाद होत्या त्यामुळे पालकांमधून व विद्यार्थ्यांमधून मोठी नाराजी सरकार विरोधात व्यक्त केली जात होती. आता मात्र  पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून 1 डिसेंबरला याचा मुहूर्त साधला गेला आहे. त्यामुळे पालकांसह अनेक महिन्यांपासून घरी बसून  असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.