पांडुरंग कारखान्याचा दिल्लीत वाजला डंका,देशातील सर्वोच्च पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात निर्माण झाला दबदबा

पांडुरंग कारखान्याचा दिल्लीत वाजला डंका,देशातील सर्वोच्च पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात निर्माण झाला दबदबा

श्रीपूर,टीम----

येेथिल श्री पांडुरंग सह.साखर कारखान्यास देशातील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांचा प्रथम क्रमांकाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट पुरस्कार केंद्रिय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा,माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार,महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आरोग्यमंत्री राजेश टोपे,फेडरेशनचे उपाध्यक्ष केतनभाई शाह यांच्या हस्ते व उत्तर प्रदेशचे सचिव भुसा रेड्डी , सी.ए.सी.पी.चे अध्यक्ष नवीन प्रकाश व मंत्री हर्षवर्धन पाटील , नॅशनल फेडरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश नाईकनवरे यांच्या उपस्थितीत कारखान्याचे चेअरमनआ.प्रशांतराव परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी,संचालक मंडळ व सहकाऱ्यांनी यांनी स्वीकारला.यामुळे पांडुरंग कारखान्याचा दिल्लीत डंका वाजला असून पांडुरंग परिवारासाठी हा आजपर्यंतचा सर्वात मोठा बहुमान असल्याचे सांगितले जात असून या पुरस्कारामुळे नक्कीच राज्यासह देशाच्या सहकार क्षेत्रात पांडुरंगाचा एक मोठा दबदबा  निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की,श्री पांडुरंग कारखान्याने नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे हीत जोपासले असून,कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्रध्येय सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारखान्याचे कामकाज चालू असून पुरस्कार मिळविणेची परंपरा कायम ठेवत याही वर्षी कारखान्याने कार्यक्षमतेमध्ये प्रभावीपणे काम केल्यामुळे नॅशनल फेडरेशनचा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळविला आहे.


देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचा अभिमान.....

साखर उद्योगातील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना श्रीपांडुरंग सहकारी साखर कारखाना असल्याचा आणि त्याचा चेअरमन असल्याचा मला अभिमान वाटतो .तसेच हा मिळालेला पुरस्कार कारखान्याचे मार्गदर्शक कै.सहकार तपस्वी सुधाकरपंत परिचारक त्यांच्या स्मृतीस अर्पण करीत आहे. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच हा पुरस्कार मिळाला असून,पांडुरग चे ऊस उत्पादक शेतकरी,कर्तव्यदक्ष अधिकारी आणि जिद्दीकामगार व माझे सर्व सहकारी संचालक मंडळ यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळाल्याची भावना आ. परिचारक यांनी व्यक्त केली.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की , नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली ही संस्था प्रत्येक वर्षी साखर कारखानदारीमध्ये सर्वोच्च काम करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देवून सन्मानीत करित असते. कारखान्याचे अल्पावधीमध्ये १२५० मे . टन क्षमतेवरुन ६००० मे.टन क्षमतेचे विस्तारीकरण केले आहे , तर २२ मेगावॅट क्षमतेचा सहविजनिर्मीती प्रकल्पाची उभारणी केली आहे .प्रतिदिनी ४५ के.एल. पी.डी. क्षमतेची डिस्टीलरी उभारली आहे . आसवनी प्रकल्पातील सांडपाणी व साखर कारखान्यातील प्रेसमड याद्वारे उत्तम प्रकारच्या कंपोष्ट खताची निर्मीती कारखाना करीत आहे . कारखान्याने अल्पावधीमध्ये अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार पटकावून कारखान्याच्या वैभवात भर घातली आहे .

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख,दिनकरभाऊ मोरे ,दिलीपराव चव्हाण,हरीश गायकवाड,तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, अरुण घोलप,कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, शेती अधिकारी श्री कुमठेकर, ऊस विकास अधिकारी श्री भालेकर, चिफ अकाउंटंट श्री काकडे,चिफ केमिस्ट श्री.एम.आर.कुलकर्णी, कंप्युटर इंजिनिअर श्री तानाजी भोसले हे अधिकारी उपस्थित होते.

पांडुरंग कारखाने स्व.तपस्वीमा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली  सामाजिक बांधिलकी जपत उत्पादक सभासद, कामगारांच्या हितासाठी अनेक नवनवीन योजना राबवल्या आहेत.आता कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासन विविध आधुनिक योजना अंमलात आणून ऊस उत्पादक सभासदांना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी परिश्रम घेत आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हे ब्रीदवाक्य घेऊन या कारखान्याची दमदार वाटचाल सुरू असल्यामुळे हा पुरस्कार समस्त पांडुरंग परिवारासाठी एक  नवचेतना असल्याचेही मानले जात आहे.