खाकी वर्दीतल्या त्या महिलेने जपली सामाजिक बांधिलकी,खांद्यावर मृतदेह घेऊन केली २ किमी पायपीट

खाकी वर्दीतल्या त्या महिलेने जपली सामाजिक बांधिलकी,खांद्यावर मृतदेह घेऊन केली २ किमी पायपीट

खाकी वर्दीतील त्या महिलेने जपली सामाजिक बांधिलकी, खांद्यावर  मृतदेह घेऊन 2 किमी पायी चालत  पोहोचली स्मशानभूमीत

हैद्राबाद टीम-

खाकी वर्दी मधील पोलीस म्हणजे कठोर असतात त्यांना  अजिबात जनभावना नाहीत ते फक्त कायद्यानंच विचार करतात. असंच कित्येकांना वाटतं. पण पोलीस फक्त आपले कर्तव्य च   बजावत नाहीत तर वेळप्रसंगी खाकी च्या पलीकडे जात सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी धावूनही येतात. वेळोवेळी  या खाकीतील माणुसकीचं दर्शन  समाजाला होत असते .असाच एक व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर  व्हायरल  झाला असून  ज्यामध्ये एका महिला पोलिसानं बेवारस मृतदेहाला खांदा दिला आहे.एवढेच नव्हे तर चक्क २ किमी पायी चालत जात मृतदेह स्मशान भूमीत नेला आहे त्यामुळे या महिला पोलीसाचे मोठं कौतुक केले जात असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


आंध्र प्रदेशमधील  या घटनेनं सर्वांचं मन जिंकलं आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक कोट्टुरू सिरीशा   यांनी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेतला आणि जवळपास दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करत त्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्या. आंध्र प्रदेश पोलिसांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशिबुग्गा पोलीस ठाण्यात त्या कार्यरत आहे. अदवी कोथरू परिसरात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली. सिरीशा तिथं तात्काळ धावून गेल्या. तिथल्या स्थानिकांना त्यांनी मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्यात आपली मदत करावी अशी विनंती केली. पण कुणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. मग काय सिरीशा यांनी मृतदेह आपल्या खांद्यावर घेतला आणि सरळ चालू लागल्या . सिरीशा यांनी सांगितलं की,आम्ही 80 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाहिला. या व्यक्तीचं कुणीच नव्हतं. पण अंत्यसंस्कार करायचे होते. तिथं कोणता रस्ता नव्हता आणि मृतदेह  शेतामार्गे गाडीतून नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांकडून मदत मागितली. पण कुणीच पुढाकार घेतला आहे.सिरीशा यांनी काही लोकांच्या मदतीनं थेट मृतदेह आपल्याच खांद्यावर घेतला. फक्त एक व्यक्ती त्यांच्यासह गेली. शेतातून रस्ता काढत त्यांनी स्मशानभूमीची वाट धरली. तब्बल दोन किलोमीटर चालत त्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्या आणि तिथं त्यांनी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.या महिला पोलिसानं केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतं आहे. सर्वांनी त्यांच्या या कामाला सलाम केला आहे.त्यामुळे खाकीतही माणुसकी लपलेली असते हे या घटनेवरून पहावयास मिळाले

.