12 वर्षांपासून बंद होता कारखाना,अभिजित पाटलांचा झाला परिसस्पर्श,महिण्यात फिरली चाक,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दर,१५दिवसांत ऊस बील व तोडणी वाहतूकदारांचे बील खात्यावर जमा
सांगोला साखर कारखान्याचा २००० रू. प्रती टनाने पहिला हफ्ता जमा-चेअरमन अभिजीत पाटील
पंढरपूर,टीम------
सांगोला तालुक्यातील वाके-शिवणे येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी चालविण्यास घेतला असून 12 वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याने अवघ्या एक महिन्यात गाळप ही सुरू केले आणि शेतकऱ्यांच्या गाळपास येणाऱ्या उसाला 15 दिवसात बील व तोडणी वाहतूकदाराचे बील देण्यात आले आहे. त्यामुळे चेअरमन अभिजित पाटील यांचा परिसस्पर्श या कारखान्याला झाला असल्यामुळे सांगोल तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मागच्या काही दिवसांपुर्वी देशाचे नेते शरद पवार यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांचे विशेष कौतुक केले होते. बारा वर्ष बंद असलेला साखर कारखाना सुरू झाल्याने पवारसाहेब ही चक्क झाले. व पवार साहेबांनी तोंड भरून चेअरमन अभिजीत पाटील यांचे अभिनंदन केले होते.
कारखाना विठ्ठल परिवाराचा....
कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 दिवसाला ऊसाचे व तोडणी वाहतूक दाराचे बील जमा करण्यात येत असून बैलपोळा व दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांचा सण गोड व्हावा म्हणून दोन हाफ्ते देण्यात येतील. विठ्ठल परिवारांतील शेतकरी सभासद, कार्यकर्त्यांनी कोणीही हवालदिल न होता हा कारखाना विठ्ठल परिवाराचा आहे.त्यामुळे परिवारातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणल्याशिवाय सांगोला कारखाना बंद करणार नाही असे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आल्यापासून अवघ्या 15 दिवसात ऊस बील दिल्याने शेतकऱ्यांमधून चेअरमन अभिजीत पाटील यांचे विशेष कौतुक होत आहे व पाटील यांनी 12 वर्षे बंद असलेल्या कारखाना चा पहिला हप्ता दोन हजार रुपये जाहीर केला असल्यामुळे तसेच दिवाळी व पोळा सण गोड करणार असल्याचे सांगितल्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.या ऑक्सिजनमॅन मुळे विठ्ठल परिवारातील सभासदांनाही नक्कीच मोठे ऑक्सिजन मिळत असल्याचे आनंददायी चित्र पहावयास मिळत आहे.